छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ

बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली. खाद्यपदार्थांचे स्टॉलही तयार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान बुधवारी (१८ फेब्रुवारी) सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर गुरुवार, १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. सर्वत्र रमजानची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, रोजेदार बांधवही याची आतुरतेने वाट पाहत आहेत. रमजानच्या अनुषंगाने बाजारातही खरेदीसाठी चांगलीच झुंबड उडत आहे. शहरातील सर्वच मशिदींमध्ये रात्री 'तरावीह'च्या विशेष नमाजचे आयोजन केले आहे.

चंद्रदर्शनानंतर अधिकृतपणे हिलाल कमिटीकडून रमजान महिन्याची घोषणा करण्यात येईल. यानंतर, गुरुवारी पहाटे रोजेदार बांधव 'सहर' करतील. गुरुवारीच पहिला रोजा राहील. रमजान महिन्यात मुस्लीम बहुल भागात भक्तिमय वातावरण असते, याशिवाय बाजारातही वेगळाच उत्साह असतो. यानिमित्ताने फळे, सुकामेवा व इतर खाद्यवस्तूंची दुकाने सजली आहे. विशेषत: सुकामेवा, ड्रायफूट, फळे, खजूर खरेदीवर भाविक भर देताहेत. विविध खाद्यपदार्थांची दुकानेही लावण्यास सुरुवात झाली आहे. मुस्लीम बांधव दररोज सायंकाळी इफ्तार खजूरचा पहिला घास घेऊन करतात. त्यामुळे खजूर व अन्य साहित्य खरेदीसाठी गर्दी आहे. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खजूर विक्रीसाठी आणल्या आहेत.

भाविकांनी सर्व नियमांचे पालन करावे
गुरुवारी पहाटे पहिल्या रोजासाठी सहर केली जाईल. पाच वेळा न चुकता नमाज अदा करणे, सायंकाळी इफ्तार, रात्री तरावीह'ची नमाज अदा करणे ही प्रत्येक रोजेदार बांधवांची दिनचर्या राहील. या शिवाय अनेक बांधव पवित्र धर्मग्रंथाचीही तिलावत करत असतात. सर्वसामान्य दिवसांपेक्षा रमजान महिन्यात नेकीयाँ' ७० पटीने वाढलेल्या असतात. त्यामुळे रोजेदार बांधवांनी सतत जिक्र' आणि तिलावत' मध्ये मन रमवावे, असे आवाहन जामीया इस्लामिया काशीफ-उल-उलूमचे मौलाना नसिमोद्दीन मिफ्ताही यांनी केले आहे.

ही आहेत रमजानची वैशिष्ट्ये
या महिन्यात मुस्लिम पहाटेपासून (सुहूर) सूर्यास्तापर्यंत (इफ्तार) अन्न-पाण्याशिवाय उपवास करतात, जे आत्मसंयमन आणि अल्लाहप्रती भक्ती दर्शवते. हा महिना कुराण प्रगट झाल्याची आठवण म्हणून पाळला जातो आणि शेवटी 'ईद-उल-फित्र' साजरी केली जाते .
-उद्देश : आत्मशुद्धी, संयम, सहिष्णुता आणि गरजूंना मदत करणे.
-रोजा (उपवास): पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्न आणि पाणी न घेणे.
-सेहरी आणि इफ्तार: पहाटेच्या जेवणाला 'सेहरी' आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडण्याच्या जेवणाला 'इफ्तार' म्हणतात.
-कुराण पठण : या महिन्यात कुराणचे जास्त पठण केले जाते.
-दान (जकात): या महिन्यात गरिबांना दान करणे आणि मदत करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
-ईद-उल-फित्र: महिनाभराच्या उपवासानंतर, चंद्र पाहून ईद-उल-फित्र साजरी केली जाते, जी आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software