स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून नारेगावमधील एका गोडाऊनमध्ये नेऊन लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केली. या प्रकरणात सिटी चौक पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (१५ फेब्रुवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

खान फैजान मोहम्मद सुब्हान (वय ३७, रा. मंजूरपुरा, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की ते पत्नी, आई व मुलाबाळासह राहतात. स्विगी कंपनीत डिलिव्हरी बॉय आहेत. राफे खान रशीद खान (रा. सेंट्रल नाका) याच्याकडून सप्टेंबर २०१५ मध्ये फैजान यांनी एक लाख रुपये घेतले होते. पैकी तीस हजार रुपये परत केले. उरलेल्या रकमेसाठी राफे खान याला वेळ मागितला होता. रविवारी (१५ फेब्रुवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास फैजान हे ड्युटीला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. त्यांच्या घराखाली राफे खान रशीद खान व त्याच्यासोबत आणखी दोघे होते. राफे खान म्हणाला, "मैंने तेरे को दिये हुए पैसे मुझे अभीच होना’. त्यावर फैजान यांनी त्याला सांगितले, की सध्या माझ्याकडे घरखर्चासाठीसुद्धा पैसे नाहीत. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी फैजान यांना बळजबरीने त्यांच्या मोटारसायकलवर बसण्याचा आग्रह केला.

फैजान यांनी नकार दिला व मोठ्यामोठ्याने आरडाओरड केली. तेथे असलेले मशिदीचे इमाम व प्रिटींग प्रेसवाले यांनी पाहिले. फैजान यांच्या पत्नीने आवाज ऐकून ती खाली येत असताना राफे याने बळजबरीने फैजान यांना मोटरसायकलवर बसवून नारेगाव येथे एका बंद गोडाऊनमध्ये नेले. तेथे राफे याने फैजान यांना हाताचापटाने मारहाण करून तुझ्या मुलांना उचलून घेऊन जाईल, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी व्हिडीओ काढून फैजान यांना लोखंडी रॉडने डाव्या दंडावर व डाव्या मांडीवर मारून दुखापत केली. नंतर रात्री साडेआठला घरी आणून सोडले. नंतर फैजान यांनी पत्नीसह सिटी चौक पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार नागोराव घुगे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software