मंत्री शिरसाटांना जंजाळांचा पुन्हा शह : शिरसाटांचे समर्थक त्र्यंबक तुपे नव्हे, जंजाळाचे समर्थक किशोर नागरे होणार गटनेते!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मंत्री संजय शिरसाट यांना आ. प्रदीप जैस्वाल आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी पुन्हा एकदा शह दिला आहे. महापालिकेतील गटनेतेपदी नगरसेवक किशोर नागरे यांना निवडण्याचे आदेश सोमवारी (१६ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शिरसाट हे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्यासाठी आग्रही होते. मात्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात आलेल्यांना इतक्यात कोणत्याही मोठ्या संधी मिळणार नाही, असा संदेशच जणू पक्षातून मिळाला आहे.

नगरपालिका निवडणुकांपासून मंत्री शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. नगरपालिका निवडणुकांसाठीच्या बैठकांना जंजाळ यांना डावलले गेल्याने वाद पेटला. आरोप-प्रत्‍यारोप झाले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तर हा वाद आणखीनच वाढला. जंजाळ हे उपमहापौर होऊ नये, यासाठीही मंत्री शिरसाट यांनी केलेली खेळी उघड झाली. तसा आरोपही जंजाळ यांनी शिरसाटांवर केला. आता महापालिकेतील पक्षाचा गटनेता निवडण्याची वेळ आली तेव्हा शिरसाटांनी त्र्यंबक तुपे यांच्यासाठी आग्रह धरला.

मात्र आ. प्रदीप जैस्वाल आणि उपमहापौर जंजाळ यांनी शिफारस केलेल्या नगरसेवक किशोर नागरे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, ते महापालिकेतील शिंदे गटाचे गटनेते असतील. या घटनेबाबत आ. जैस्वाल म्हणाले, की शिंदे गटाचे सर्व नगरसेवक मुंबईला गेले होते. मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत किशोर नागरे यांची गटनेतेपदी निवड झाली. आमच्या पक्षात कोणतेही गट, तट नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानेच जंजाळ व नागरेंची निवड झाली, असे ते म्हणाले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software