सत्तारांनी महादेवाचे मंदिरात जाऊन घेतले दर्शन, हिंदुत्ववादी संतापले, गोमूत्र शिंपडून मंदिर पवित्र केले!, सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाशिवरात्रीला सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील  नागेश्वर मंदिराला भेट दिल्यानंतर आ. अब्‍दुल सत्तार यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्‍यामुळे ते कट्टर हिंदुत्‍ववाद्यांच्या टीकेचे ते धनी बनले असून, त्‍यांच्या या कृत्‍यावर संताप व्यक्‍त करत गावातील काही तरुणांनी एकत्र येत मंदिरात गोमूत्र शिंपडले आणि मंदिर पवित्र केल्याचे म्हटले.

भाजपचे सिल्लोड शहराध्यक्ष मनोज मोरल्लू म्हणाले, की सत्तार हे गोमांस खातात. त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने मंदिर अपवित्र झाले. त्यांनी हिंदुंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे गावातील तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडून मंदिर पवित्र केले, असे मोरेल्लू यांनी सांगत सत्तारांच्या कृत्‍याचा निषेध केला आहे. भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनीही सत्तारांवर टीका केली आहे. ते म्हणाले, की अब्दुल सत्तार यांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय का, हिंदू धर्म स्वीकारला आहे का? तसे नसेल त्यांनी गर्भगृहाच्या बाहेरुन दर्शन घ्यायला हवे होते. आमच्या देवी-देवतांचे मंदिरं ही काही स्मारकं नाहीत. गर्भगृहाचे धार्मिक नियम असतात. राजकीय फायद्यासाठी आमच्या धर्माचे धार्मिक नियम मोडू नका. तुम्हाला खूपच इच्छा असेल तर मग हिंदू धर्म स्वीकारा आणि खुशाल आमच्या देवी-देवतांचे आशीर्वाद मिळवा, असे ते म्हणाले.
आ. दानवेंनी केले सत्तारांच्या कृतीचे समर्थन
दरम्यान, या घटनेबद्दल ठाकरे गटाचे आ. अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की मंदिर असो की मशीद हे सर्व सार्वजनिक ठिकाणे आहे. तुषार कोण शंकराचार्य लागून गेला आहे का? एखादा मुस्लीम माणूस मंदिरात जाऊन दर्शन करत असेल, तर त्याचे स्वागत करावे का त्याला विरोध करावा? भाजप धर्माला संकुचित बनवत आहे. हिंदू धर्म व्यापक आहे, असे आ. दानवे म्हणाले. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सत्तारांनी महादेवाचे मंदिरात जाऊन घेतले दर्शन, हिंदुत्ववादी संतापले, गोमूत्र शिंपडून मंदिर पवित्र केले!, सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादची घटना

Latest News

सत्तारांनी महादेवाचे मंदिरात जाऊन घेतले दर्शन, हिंदुत्ववादी संतापले, गोमूत्र शिंपडून मंदिर पवित्र केले!, सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादची घटना सत्तारांनी महादेवाचे मंदिरात जाऊन घेतले दर्शन, हिंदुत्ववादी संतापले, गोमूत्र शिंपडून मंदिर पवित्र केले!, सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादची घटना
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाशिवरात्रीला सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील  नागेश्वर मंदिराला भेट दिल्यानंतर आ. अब्‍दुल सत्तार यांनी मंदिरात जाऊन...
हर्सूल सावंगीत साऊंड सिस्टिम व लायटिंग डेकोरेशनचे दुकान फोडले, ९ लाखांचे साहित्‍य लंपास
खडकेश्वरजवळील BSNL चौकात स्कोडा कारचालकाचा थरार, स्कुटीस्वार व्यावसायिक जखमी
दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडताच काळाने घातला घाला!; स्कुटीच्या धडकेने वृद्धाचा मृत्‍यू, हर्सूलची घटना
विदेशी  नागरिकाला अवैध घर भाड्याने दिले; पोलिसांनी घरमालकावर दाखल केला गुन्हा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software