- News
- पॉलिटिक्स
- राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा ट...
राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजेंद्र जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी आता चांगले काम करावे. पुढे जाऊन ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत, असा खोचक टोला मंत्री संजय शिरसाट यांनी लगावला. दरम्यान, जंजाळ यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, की मी पालकमंत्रीही होऊ शकतो...
महापालिकेत गटनेता नियुक्तीवरून सध्या मंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यात वाक्युद्ध रंगले आहे. शिरसाट हे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या त्र्यंबक तुपे यांच्यासाठी आग्रही आहेत, जंजाळ यांनी पक्षात निष्ठेने काम करणाऱ्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सोडून वेगळा मार्ग निवडल्यानंतर सर्वात आधी त्यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांपैकी राजेंद्र जंजाळ हे आले होते. त्यावेळी जे लोक गद्दार म्हणून हेटाळणी करत होते, ते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात आले. त्यांनी मंत्री शिरसाट यांच्या भोवती कोंडावळा केला, तसे शिरसाटांच्या सोबत सावलीप्रमाणे राहणारे जंजाळ दूर दूर होत गेले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
महाशिवरात्र यात्रेमुळे रविवारी वेरूळमध्ये वाहनांना प्रतिबंध
By City News Desk
मिसारवाडीत महिलांना भेटला ठग, चौघींनी डोक्याला लावला हात!
By City News Desk
Latest News
12 Feb 2026 22:25:57
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजेंद्र जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी...

