- News
- सिटी क्राईम
- पत्नीसमक्ष लाचखोर झिरो लिपिक सागर जाधव ACB च्या जाळ्यात!, रेल्वेच्या डब्यातच अटक, उपनिबंधकांच्या ना...
पत्नीसमक्ष लाचखोर झिरो लिपिक सागर जाधव ACB च्या जाळ्यात!, रेल्वेच्या डब्यातच अटक, उपनिबंधकांच्या नावाने घेतले होते पैसे... छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर काय घडलं...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मराठवाडा अर्बन बँक को-ऑपरेटिव्ह असोसिएशनचा ‘झिरो लिपिक’ सागर कारभारी जाधव (वय ३२, रा. वैजापूर) याची पत्नीसमक्षच नाचक्की झाली. १० हजार रुपयांची लाच घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर बुधवारी (११ फेब्रुवारी) रात्री करण्यात आली.
तक्रारदार ३५ वर्षीय तरुणाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत देवगिरी बँकेमधून व्यवसायासाठी पाच लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते थकल्याने देवगिरी बँकेने त्याच्यावर कारवाईची नोटीस जारी केली. सागर जाधव हा सहकार खात्याशी संबंधित मराठवाडा अर्बन बँक को-ऑपरेटिव्ह असोसिएशनमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणवला जातो. मात्र त्याला प्रत्यक्षात नियुक्तीपत्र नाही. तरीही तो स्वतंत्र टेबल थाटून तो उपनिबंधकांच्या नावाने कामे करायचा. त्याने तक्रारदाराला कारवाई टाळून हफ्त्याला मुदतवाढ देण्यासाठी १२ हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी २ हजार रुपये आधीच ऑनलाइन स्वीकारले होते. बाकीच्या १० हजारांसाठी त्याने तरुणाकडे तगादा लावला.
अखेर कंटाळून तरुणाने ‘एसीबी’ अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे तक्रार केली. ‘एसीबी’ने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांनी सहकाऱ्यांसह मिळून जाधवला रंगेहात पकडण्यासाठी बुधवारी दुपारी रोपळेकर चौकातील सापळा अयशस्वी ठरला होता. त्यानंतर जाधवने १० हजार रुपये घेऊन तरुणाला रेल्वेस्थानकावर बोलावले. पोलीस उपअधीक्षक संगिता पाटील, पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, पोलीस अंमलदार राजेंद्र नंदिले, सचिन बारसे, सी. एन. बागूल यांनी रेल्वेस्थानकावर सापळा रचला. जाधव पत्नीसह रेल्वेत बसलेला होता. तरुणाने त्याच्याशी खिडकीतून संवाद साधला. रेल्वे निघायची वेळ झाल्याने जाधवने त्याला ‘मीच साहेब आहे, कारवाई होणार नाही...’ असे म्हणत त्याच्याकडून १० हजार रुपये घेतले. त्याचवेळी गुसिंगे यांनी डब्यात चढून पत्नीसमक्षच सागरला अटक केली. या प्रकरणात उपनिबंधकांचा संबंध आहे का, असा प्रश्न निर्माण झाला असून, त्यादृष्टीने सखोल तपासाची आवश्यकता निर्माण झाली आहे. कारण एकटा जाधव इतके मोठे धाडस नक्कीच करणार नाही, असे मत व्यक्त होत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
महाशिवरात्र यात्रेमुळे रविवारी वेरूळमध्ये वाहनांना प्रतिबंध
By City News Desk
मिसारवाडीत महिलांना भेटला ठग, चौघींनी डोक्याला लावला हात!
By City News Desk
Latest News
12 Feb 2026 22:25:57
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजेंद्र जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी...

