धारदार कोयता घेऊनच फिरायचा... सामान्यांना दहशतीखाली घेणारा रितेश पोलिसांना पाहून असा पळाला की..., शिवाजीनगरमध्ये ‘भागम्‌भाग’

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चोरी, घरफोडी, लुटमारी, धारदार शस्त्र बाळगणे असे ८ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला जवाहरनगर पोलिसांनी शिवाजीनगरमध्ये पकडले. त्याच्याकडे धारदार लोखंडी कोयता, धारदार चाकू मिळून आला. ही कारवाई मंगळवारी (१० फेब्रुवारी) दुपारी २ च्या सुमारास करण्यात आली. रितेश उर्फ लड्या नितीन दोडवे (वय २०, रा. झेंडा चौक बौद्धविहाराजवळ, गारखेडा परिसर) असे त्याचे नाव आहे.

शिवाजीनगर परिसरातील जंबुरे हॉस्पिटलजवळ रितेश हातात धारदार लोखंडी कोयता घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती डायल ११२ बिट मार्शलचे पोलीस अंमलदार मारोती गोरे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना दिली. त्यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस पथकाने जंबुरे हॉस्पिटलकडे धाव घेतली. रितेश हा धारदार कोयता व मोपेड स्कुटीसह दिसून आला. पोलिसांना पाहून तो पळू लागला. पाठलाग करून काही अंतरावरच पोलिसांनी त्याची मानगूट पकडली. त्याच्याकडील विना नंबरच्या मोपेड स्कुटीबाबत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या ताब्यातून धारदार लोखंडी कोयता, धारदार चाकू व विना नंबरची मोपेड स्कुटी असा एकूण १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध पोलीस अंमलदार मारोती गोरे यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रितेशविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे
रितेशविरुद्ध यापूर्वीही जवाहरनगर, उस्मानपुरा, सातारा पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी, लुटमारी, धारदार शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनोज पगारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार श्री. बनकर, श्री. पठाण, डायल-११२ बीट मार्शलचे पोलीस अंमलदार श्री. उईके, मारोती गोरे, श्री. शेलार यांनी पार पाडली. अधिक तपास सहायक फौजदार श्री. नलावडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले!

Latest News

राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले! राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजेंद्र जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी...
नियोजन समितीची बैठक : छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी १५०० कोटींचा आराखडा!
१,४३७ तरुण-तरुणींची जागेवरच जॉबसाठी प्राथमिक निवड, छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठात झाला मेळावा, मुंबई-पुण्याच्याही कंपन्यांनी घेतला सहभाग
महाशिवरात्र यात्रेमुळे रविवारी वेरूळमध्ये वाहनांना प्रतिबंध
घरच्यांचा विरोध डावलून प्रेमविवाह केला, धक्कादायकरित्या जीवन संपवले!; मृतकाच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल, तरुणाच्या घरच्यांनी केले गंभीर आरोप, हर्सूलची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software