मम्मी मी घर सोडून पळून चाल्ले, लोकांना असंच सांग शेतात आजी-आजोबाकडे राहते...चिठ्ठी लिहून १७ वर्षीय मुलगी भुर्रऽऽ, फुलंब्री तालुक्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मम्मी मी पळून चालले...कोणाला सांगू नको, कोणी विचारले तर सांग की मी शेतात आजी-आजोबाकडे आहे... अशी चिठ्ठी लिहून १७ वर्षे ६ महिने २० दिवस वयाची मुलगी घर सोडून गेली आहे. तिला पळवून नेण्यात आल्याची तक्रार तिच्या आईने वडोद बाजार (ता. फुलंब्री) पोलिसांत केली आहे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे.

वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अपहृत मुलीचे आई-वडील मोलमजुरी करतात. ७ फेब्रुवारीला दुपारी १ च्या सुमारास ते नातेवाइकाच्या अंत्‍यसंस्कारासाठी घाटनांद्र्याला गेले होते. संध्याकाळी सहाला परतले असता पलंगावर वहीच्या पानावर लिहिलेली चिठ्ठी सापडली. आई-वडिलांनी तिचा सगळीकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली. पोलीस दफ्तरी नोंद झाल्यानुसार, छत्रपती संभाजीनगर शहर-जिल्ह्यातून एकूण ९८ जण गेल्या १ फेब्रुवारीपासून आजवर बेपत्ता झाले आहेत. यात ६२ महिला, मुलींचा समावेश आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले!

Latest News

राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले! राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजेंद्र जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी...
नियोजन समितीची बैठक : छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी १५०० कोटींचा आराखडा!
१,४३७ तरुण-तरुणींची जागेवरच जॉबसाठी प्राथमिक निवड, छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठात झाला मेळावा, मुंबई-पुण्याच्याही कंपन्यांनी घेतला सहभाग
महाशिवरात्र यात्रेमुळे रविवारी वेरूळमध्ये वाहनांना प्रतिबंध
घरच्यांचा विरोध डावलून प्रेमविवाह केला, धक्कादायकरित्या जीवन संपवले!; मृतकाच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल, तरुणाच्या घरच्यांनी केले गंभीर आरोप, हर्सूलची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software