१,४३७ तरुण-तरुणींची जागेवरच जॉबसाठी प्राथमिक निवड, छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठात झाला मेळावा, मुंबई-पुण्याच्याही कंपन्यांनी घेतला सहभाग

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात २,११७ उमेदवारांनी हजेरी लावली. त्यापैकी १४३७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, अशी माहिती प्लेसमेंट ऑफीसर डॉ. गिरीष काळे यांनी दिली.

633153687_1237880345109659_55242 (1)

मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई येथील नामांकित विविध ४७ कंपन्यांचा मेळाव्यात सहभाग घेतला. टोयोटा किर्लोस्कर मोटर, अथर एनर्जी, पर्किन्स इंडिया, ऋचा इंजिनिअर्स, मेडी-रिक्रूटर, कल्याण ज्वेलर्स, कॉस्मो फिल्म्स, क्लॅड मेटल इंडिया, बागला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीस, एस. एस. कंट्रोल, मेटलमॅन ऑटो, एल. आय. सी., इंस्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एक्सीडी इंडिया लि.,ज्ञानदीप फाउंडेशन सेंटर, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी प्रा. लि., के. आर. बेदमुथा टेक्नो असोसिएटस या नामांकित कंपन्या त्यांच्याकडील रिक्तपदे घेऊन सहभागी झाल्या होत्या.

त्यासमवेत स्वयंरोजगारासाठी विविध महामंडळांचे स्टॉलसुद्धा माहिती देण्यासाठी मेळाव्यात हजर होते. मेळाव्यासाठी २,११७ नोकरी इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहून नोंदणी केली. विविध आस्थापनांकडे ४,०८१ मुलाखती पार पडल्या. त्यापैकी १,४३७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व सेंट्रल ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, मॅन युनायटेड व सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले!

Latest News

राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले! राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजेंद्र जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी...
नियोजन समितीची बैठक : छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी १५०० कोटींचा आराखडा!
१,४३७ तरुण-तरुणींची जागेवरच जॉबसाठी प्राथमिक निवड, छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठात झाला मेळावा, मुंबई-पुण्याच्याही कंपन्यांनी घेतला सहभाग
महाशिवरात्र यात्रेमुळे रविवारी वेरूळमध्ये वाहनांना प्रतिबंध
घरच्यांचा विरोध डावलून प्रेमविवाह केला, धक्कादायकरित्या जीवन संपवले!; मृतकाच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल, तरुणाच्या घरच्यांनी केले गंभीर आरोप, हर्सूलची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software