- News
- सिटी क्राईम
- धक्कादायक : व्हॅलेंटाइन वीकमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातून रोज २ तरुणी सोडताहेत घर!
धक्कादायक : व्हॅलेंटाइन वीकमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातून रोज २ तरुणी सोडताहेत घर!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सध्या व्हॅलेंटाइन वीक असून, या प्रेमाच्या आठवड्यात तरुणाईवर प्रेमाचा फिवर चढला आहे. यातून किंवा अन्य कारणाने शहरातून रोज २ तरुण मुली घर सोडत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘मेट्रोपोलिस पोस्ट-छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज’च्या समोर आला आहे. या नोंदी पोलीस दफ्तरी झाल्या असून, शहरातील पोलीस ठाण्यांतून घेतलेल्या माहितीनुसार जे आकडे समोर आले, ते हादरवणारे आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागातून १० तरुणी याकाळात बेपत्ता झाल्या आहेत. यात शनी देवगाव (पोलीस ठाणे विरगाव) येथून २३ वर्षीय तरुणी, लासूरस्टेशन (पोलीस ठाणे शिल्लेगाव) येथून १८ वर्षीय तरुणी, पिशोर येथून (पोलीस ठाणे पिशोर) २४ वर्षीय व २३ वर्षीय अशा २ तरुणी, झाल्टा (पोलीस ठाणे चिकलठाणा) येथून २७ वर्षीय तरुणी, गंगापूर येथून २७ वर्षीय तरुणी, उपळी (पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण) येथून २४ वर्षीय तरुणी, सिसारखेडा (पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण) येथून २३ वर्षीय तरुणी, पाचोड येथून २२ वर्षीय तरुणी, वैजापूर शहरातून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
महाशिवरात्र यात्रेमुळे रविवारी वेरूळमध्ये वाहनांना प्रतिबंध
By City News Desk
मिसारवाडीत महिलांना भेटला ठग, चौघींनी डोक्याला लावला हात!
By City News Desk
Latest News
12 Feb 2026 22:25:57
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजेंद्र जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी...

