- News
- सिटी क्राईम
- घरच्यांचा विरोध डावलून प्रेमविवाह केला, धक्कादायकरित्या जीवन संपवले!; मृतकाच्या पत्नीविरुद्ध गुन्हा
घरच्यांचा विरोध डावलून प्रेमविवाह केला, धक्कादायकरित्या जीवन संपवले!; मृतकाच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल, तरुणाच्या घरच्यांनी केले गंभीर आरोप, हर्सूलची घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : व्हॅलेंटाइन वीकमध्येच एक दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. घरच्यांचा विरोध डावलून तरुणाने प्रेमविवाह केला. त्यांच्या प्रेमवेलीवर फुलही उमलले. मात्र नंतर या जोडप्यात असे काही घडले, की त्याने आत्महत्या केली असून, बेगमपुरा पोलिसांनी त्याच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी (९ फेब्रुवारी) पहाटे पावणेदोनला (मध्यरात्री) पहाडसिंगपुऱ्यातील लॉजवर घडली.
रविनाथचे भाऊ अमोल यांनी शिवानीवर तक्रारीत आरोप केले आहेत, की शिवानीने कोणत्या तरी मुलीसोबत बोलतो, असा संशय घेऊन मानसिक त्रास देऊन त्याच्या सोबत सतत भांडण करून, त्यास त्याच्या मुलासोबत बोलू न देता आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. तिच्या त्रासाला कंटाळून सोमवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास त्याने पहाडसिंगपुऱ्यातील श्री साई लॉज (गुरुगणेशनगर) येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला डॉक्टरांनी तपासून पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी मृत घोषित केले, असे तक्रारीत म्हटले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
महाशिवरात्र यात्रेमुळे रविवारी वेरूळमध्ये वाहनांना प्रतिबंध
By City News Desk
मिसारवाडीत महिलांना भेटला ठग, चौघींनी डोक्याला लावला हात!
By City News Desk
Latest News
12 Feb 2026 22:25:57
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजेंद्र जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी...

