पैठणमध्ये काँग्रेसचे वरातीमागून घोडे... रवींद्र काळेंचा शिंदे गटात प्रवेश, विनोद तांबे अजित पवार गटात अन्‌ आता निवडणुका झाल्यावर काँग्रेसकडून कारवाई!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : काँग्रेसच्या बाबतीत पैठण तालुक्यात वरातीमागून घोडे ही म्हण तंतोतंत जुळताना दिसली आहे. प्रदेश काँग्रेसचे सचिव रवींद्र काळे आणि पैठणचे माजी तालुकाध्यक्ष विनोद तांबे यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने पक्षातून निलंबित केले आहे. आश्चर्याची बाब अशी, की हे दोन्ही आधीच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात दाखलही झाले आहेत. आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्‍यांना कारवाईचे सूचले आहे.

रवींद्र काळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांच्या नातेवाइकाने पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. विनोद तांबे यांनी अजित पवार गटात प्रवेश करून विहामांडवा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढली, मात्र ते पराभूत झाले. थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले. निलंबनाचे पत्र नवनियुक्त तालुकाध्यक्ष रमेश मुळे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. निवडणूक काळातच कारवाई करणे गरजेचे असताना आता हे वरातीमागून घोडे नाचवण्याचा प्रकार सपकाळांनी कशासाठी केला असावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही औपचारिकता पार पाडण्यापेक्षा तालुक्यात काँग्रेसला बळ देण्यासाठी काय करता येईल, याकडे आता पक्षाने लक्ष देण्याची गरज कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले!

Latest News

राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले! राजेंद्र जंजाळांसारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य, मंत्री संजय शिरसाट यांचा टोला, आता गटनेतेपदावरून दोन्ही नेते भिडले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजेंद्र जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी...
नियोजन समितीची बैठक : छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी १५०० कोटींचा आराखडा!
१,४३७ तरुण-तरुणींची जागेवरच जॉबसाठी प्राथमिक निवड, छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठात झाला मेळावा, मुंबई-पुण्याच्याही कंपन्यांनी घेतला सहभाग
महाशिवरात्र यात्रेमुळे रविवारी वेरूळमध्ये वाहनांना प्रतिबंध
घरच्यांचा विरोध डावलून प्रेमविवाह केला, धक्कादायकरित्या जीवन संपवले!; मृतकाच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल, तरुणाच्या घरच्यांनी केले गंभीर आरोप, हर्सूलची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software