ठरलं एकदाचं... सत्तेसाठी पुन्हा युती : महापौर भाजपचे समीर राजूरकर होणार, उपमहापौरपदासाठी राजेंद्र जंजाळ उमेदवार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक भलेही भाजप-शिंदे गटाने स्वतंत्ररित्या लढली, पण सत्तेसाठी समान विचारांचे हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. अपेक्षेप्रमाणे भाजपने महापौरपदासाठी समीर राजूरकर यांना उमेदवारी घोषित केली असून, उपमहापौरपदासाठी शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ हे उमेदवार असणार आहेत.

महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज, ६ फेब्रुवारी शेवटचा दिवस आहे. काल संध्याकाळी भाजपकडून महापौरपदाचा उमेदवार घोषित होईल, अशी शक्यता होती. पण दुपारी सभागृह गट नेतेपदी प्रा. गोविंद केंद्रे यांची घोषणा झाल्यानंतर भाजपमध्ये चर्चेचा खल सुरू राहिला. आज सकाळी महापौरपदासाठी उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आधी महापालिकेत भाजप-शिंदे गट सोबत येणार असल्याचे ठरले. लगोलग राजूरकर आणि जंजाळ यांची नावे महापौर-उपमहापौरपदासाठी अंतिम करण्यात आली. या दोन्ही उमेदवारांना एमआयएमच्या उमेदवारांशी लढावे लागणार आहे.

महापौरपदासाठी भाजपकडून समर्थनगर प्रभागाचे समीर राजूरकर, मयूर पार्क प्रभागाचे विजय औताडे आणि रोजाबाग प्रभागाचे राजगौरव वानखेडे यांच्यात स्पर्धा रंगली होती. राजूरकर यांच्यासाठी मंत्री अतुल सावे आणि खा. डॉ. भागवत कराड यांनी जोर लावला होता, तर औताडे यांच्यासाठी हरिभाऊ बागडे आणि रावसाहेब दानवे यांनी प्रयत्‍न केले. पक्षश्रेष्ठींनी राजूरकर यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ टाकण्याचे ठरवले. छत्रपती संभाजीनगरचे महापौरपद खुले (सर्वसाधारण) आहे. महापालिकेत भाजप ५७, एमआयएम ३३, शिंदे गट १३, ठाकरे गट ६, वंचित बहुजन आघाडी ४, राष्ट्रवादी शरद पवार गट १, काँग्रेस १ असे पक्षीय बलाबल आहे.

सावे, कराडांचे वजन वाढले...
महापालिका निवडणूक भाजपने मंत्री अतुल सावे आणि खा. डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्त्वात लढली आणि बहुमताने जिंकली. एकहाती सत्तेसाठी केवळ १ जागा कमी पडली. अन्यथा एकहाती सत्ता आली असती. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी महापालिकेतील सत्तेतील पदे सोपवतानाही दोन्ही नेत्‍यांच्या शब्दाला मान दिल्याची चर्चा आहे. सावे आणि कराडांचे पक्षातील वजन वाढल्याचे हे द्योतक आहे.

सर्वसाधारण प्रवर्गातील यापूर्वीचे महापौर
गजानन बारवाल (१८-४-१९९६ ते ७-५-१९९७),
सुदाम सोनवणे (२०-४-१९९९- ते २९-४-२०००),
किशनचंद तनवाणी (२९-४-२००५ ते ४-११-२००६),
विजया रहाटकर (२९-१०-२००७ ते २८-४-२०१०),
त्र्यंबक तुपे (२९-४-२०१५ ते ३०-११-२०१६)
भगवान घडमोडे (१४-१२-२०१६ ते २८-१०-२०१७).

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना

Latest News

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हुल का दिली, असे म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कमरेच्या...
वाळूज महानगरात उद्या २२३ मतदान केंद्रांवर मतदान; ८ गट, १४ गणांतील निवडणूक रणधुमाळी; ३७८ पोलीस-होमगार्ड तैनात 
हर्सूलच्या हरसिध्दीनगरातील शिवदत्तात्रय मंदिरात चोरी, CCVT त चोरटे कैद!, पहा चोरट्यांनी कशी केली चोरी...
वेरूळला महाशिवरात्रीनिमित्त यात्रा; वाहतूक मार्गात मोठे बदल
एमआयएमच्या ‘या’ १६ नगरसेवकांवर टांगती तलवार, कुणी आणले अडचणीत अन्‌ कोणत्या कारणास्तव, जाणून घेऊ...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software