हर्सूलच्या हरसिध्दीनगरातील शिवदत्तात्रय मंदिरात चोरी, CCVT त चोरटे कैद!, पहा चोरट्यांनी कशी केली चोरी...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूलच्या हरसिद्धीनगरातील शिवदत्तात्रय मंदिरात गुरुवारी (५ फेब्रुवारी) पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास दोन चोरट्यांनी दानपेटी फोडून चोरी केली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, हर्सूल पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन पाहणी केली. चोरट्यांना लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी भाविकांतून होत आहे.

दिगंबर विष्णूपंत मुळे (वय ४५, रा. शिवदत्तात्रय मंदिर, हरसिध्दीनगर, हर्सूल) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते मंदिराच्या परिसरात बांधून दिलेल्या घरात राहण्यास आहेत. पुजारी काम करून वेदपाठशाळेतील मुलांवर लक्ष ठेवतात. बुधवारी (४ फेब्रुवारी) रात्री साडेदहाला पुजारी मुळे हे जेवण करून झोपी गेले. गुरुवारी (५ फेब्रुवारी) सकाळी सहाला झोपेतून उठले. अंघोळीला जात असताना त्यांना मंदिराचे ट्रस्टी व संस्थापक अरुण जोशी यांचा मुलगा तुषार याचा फोन आला. त्यानेच मुळे यांना मंदिरात चोरी झाल्याचे सांगितले.

त्यामुळे मुळे यांनी धाव घेऊन पाहिले असता मंदिरातील मुख्य दरवाजाची आतील कडी उघडून दरवाजा उघडलेला दिसला. मंदिरातील दानपेटीचेही कुलूप तुटलेले दिसले. दानपेटी उघडून त्यातील पैसे चोरट्यांनी चोरलेले दिसले. दानपेटीतील अंदाजे आठ ते दहा हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मंदिराचे CCTV कॅमेरे तपासले असता मंदिरात गुरुवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास दानपेटी फोडून पैसै काढून नेताना दोन चोर तोंडाला मफलर बांधलेल्या अवस्थेत दिसत आहेत. घटनास्‍थळी फुलंब्री पोलिसांनी येऊन पाहणी केली. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार शकील शेख करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना

Latest News

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हुल का दिली, असे म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कमरेच्या...
वाळूज महानगरात उद्या २२३ मतदान केंद्रांवर मतदान; ८ गट, १४ गणांतील निवडणूक रणधुमाळी; ३७८ पोलीस-होमगार्ड तैनात 
हर्सूलच्या हरसिध्दीनगरातील शिवदत्तात्रय मंदिरात चोरी, CCVT त चोरटे कैद!, पहा चोरट्यांनी कशी केली चोरी...
वेरूळला महाशिवरात्रीनिमित्त यात्रा; वाहतूक मार्गात मोठे बदल
एमआयएमच्या ‘या’ १६ नगरसेवकांवर टांगती तलवार, कुणी आणले अडचणीत अन्‌ कोणत्या कारणास्तव, जाणून घेऊ...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software