हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हुल का दिली, असे म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कमरेच्या बेल्टसह लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यात तिन्ही तरुण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (५ फेब्रुवारी) रात्री ९ च्‍या सुमारास सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळ घडली.

हर्ष सुखदेव चव्हाण (वय २३, रा. जयभवानीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो पत्नी व मोठ्या भावासह राहतो. तो खासगी कंपनीत काम करतो. गुरुवारी (५ फेब्रुवारी) रात्री ९ च्‍या सुमारास हर्ष आणि त्याचे मित्र आदित्य बाळू अहिरे (वय १९, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा), रोहित विष्णू सोनवळे (वय २०, रा. गल्ली नं. २, मुकुंदवाडी) असे तिघे हर्षच्या वाढदिवसासाठी केक आणण्यासाठी मोटरसायकलीने जात होते. लेमन ट्री हॉटेलसमोरील सर्व्हिस रोडने कॅनॉट प्लेसकडे जात असताना रिक्षाने (MH 20 EK 9606) त्यांना हुल दिली. त्यामुळे हर्षने मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला थांबविली. रिक्षाचा चालक हा हर्ष आणि त्याच्या मित्रांकडे आला.

हुल का दिली, असे बोलून शिवीगाळ केली. हर्ष रिक्षाचालकाची समजूत घालत असताना त्याने त्या ठिकाणी असलेल्या त्याच्या ओळखीच्या दोघांना आवाज देऊन बोलावले. त्या तिघांनी हर्ष आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ करून हाताचापटाने, कमरेच्या बेल्टने व लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले. मारहाण करणाऱ्यांची नावे अजय गौतम दाभाडे, प्रज्वल विजय भंडारे व आकाश भाऊसाहेब निकाळजे (सर्व रा. आंबेडकरनगर) असल्याचे हर्षला तेथील लोकांकडून समजले. सिडको पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार भाऊसाहेब जगताप करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना

Latest News

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हुल का दिली, असे म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कमरेच्या...
वाळूज महानगरात उद्या २२३ मतदान केंद्रांवर मतदान; ८ गट, १४ गणांतील निवडणूक रणधुमाळी; ३७८ पोलीस-होमगार्ड तैनात 
हर्सूलच्या हरसिध्दीनगरातील शिवदत्तात्रय मंदिरात चोरी, CCVT त चोरटे कैद!, पहा चोरट्यांनी कशी केली चोरी...
वेरूळला महाशिवरात्रीनिमित्त यात्रा; वाहतूक मार्गात मोठे बदल
एमआयएमच्या ‘या’ १६ नगरसेवकांवर टांगती तलवार, कुणी आणले अडचणीत अन्‌ कोणत्या कारणास्तव, जाणून घेऊ...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software