मुकुंदवाडीतील श्री समर्थ ज्वेलर्सला भीषण आग, लाखोंचे नुकसान

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडीतील मुख्य बाजारपेठेत विजय परमेश्वरी यांच्या इमारतीत सुधीर बुऱ्हाडे यांचे श्री समर्थ ज्वेलर्स दुकान आहे. या दुकानाला गुरुवारी (५ फेब्रुवारी) सायंकाळी ५:३० वाजता आग लागली. आगीत दुकानातील सर्व नोंदवह्यांसह लाखो रुपयांच्या सोने-चांदीच्या दागिन्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सुधीर बुऱ्हाडे गुरुवारी दुपारी दुकानात होते. त्यांच्या नातेवाइकाचे निधन झाल्याने साधारण दुपारी ३ च्या सुमारास ते दुकान बंद करून अंत्यसंस्कारासाठी गेले. ५ च्या सुमारास दुकानातून अचानक धूर येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवले. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, विनायक कदम, ड्युटी अधिकारी चेतन तरोळे, सोमीनाथ भोसले यांच्या पथकाने धाव घेतली.

त्यांनी पाण्याचा मारा करून आग तासभरात आटोक्यात आणली. घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. बोऱ्हाडे यांनी २ दिवसांपूर्वी दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. दरम्यान, या घटनेनंतर मुकुंदवाडीतील अतिक्रमणांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. भररस्त्यात भाजी विक्रेते दुकाने मांडतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अग्निशमन दलाचा बंब आग विझविण्यासाठी येत असताना या अतिक्रमणांमुळे तो येऊ शकत नव्हता. अखेर भाजी विक्रेत्यांना उठविण्यात आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना

Latest News

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हुल का दिली, असे म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कमरेच्या...
वाळूज महानगरात उद्या २२३ मतदान केंद्रांवर मतदान; ८ गट, १४ गणांतील निवडणूक रणधुमाळी; ३७८ पोलीस-होमगार्ड तैनात 
हर्सूलच्या हरसिध्दीनगरातील शिवदत्तात्रय मंदिरात चोरी, CCVT त चोरटे कैद!, पहा चोरट्यांनी कशी केली चोरी...
वेरूळला महाशिवरात्रीनिमित्त यात्रा; वाहतूक मार्गात मोठे बदल
एमआयएमच्या ‘या’ १६ नगरसेवकांवर टांगती तलवार, कुणी आणले अडचणीत अन्‌ कोणत्या कारणास्तव, जाणून घेऊ...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software