जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : प्रचारतोफा थंडावल्या, आजचा दिवस अन्‌ रात्र वैऱ्याची... धनदांगड्या उमेदवाराकडून ‘लक्ष्मीदर्शन’च्या धसक्याने बाकीचे उमेदवार अलर्ट!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या प्रचारतोफा गुरुवारी (५ फेब्रुवारी) रात्री १० ला थंडावल्या. आज, ६ फेब्रुवारीचा दिवस आणि रात्र उमेदवारांसाठी वैऱ्याची ठरणार असून, धनदांडग्या उमेदवारांकडून मतदारांना लक्ष्मीदर्शन घडविण्याची शक्यता असल्याने प्रशासनाबरोबरच बाकीचे उमेदवारही अलर्ट झाले आहेत. उद्या, ७ फेब्रुवारीला मतदान आहे.

या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ६३ गटांसाठी २८५ उमेदवार, तर पंचायत समितीच्या १२६ गणांसाठी ५३२ उमेदवार नशीब आजमावत आहेत. २७ जानेवारीपासून सर्वच राजकीय पक्षांनी पूर्ण ताकद प्रचारात लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निवडणूक ५ फेब्रुवारीऐवजी ७ फेब्रुवारीला होत आहे. पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात कुठेच प्रचारसभा घेतल्या नाहीत. महसूलमंत्री चंद्रशेखरबावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. भागवत कराड आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी मैदानात उतरून प्रचारसभा घेत कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीत हिरीरीने सहभाग घेतला आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्‍न केले आहेत.

ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पायाला भिंगरी लावून जिल्हाभर फिरले. दुसरीकडे त्यांच्यावर कायम आरोप-प्रत्‍यारोप करणारे माजी खासदार चंद्रकांत खैरे कुठेच प्रचारात दिसले नाहीत. यामुळे खैरेंबद्दल सामान्य कार्यकर्त्यांत नाराजी व्यक्त होत आहे. अंबादास दानवे यांनी प्रत्येक तालुक्यात सभा घेतल्या. त्यांना उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांची साथ लाभली.

शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेऊन कार्यकर्त्यांना बळ दिले. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभा घेतल्या, पालकमंत्री संजय शिरसाट, खा. संदीपान भुमरे यांनीही विविध गटांतील प्रचारसभा गाजवल्या. काँग्रेसनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची करत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा. कल्याण काळे यांनी जिल्ह्यात प्रचारसभा घेऊन सरकारवर टीकास्‍त्र सोडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर प्रचार टाळण्यात आला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना

Latest News

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हुल का दिली, असे म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कमरेच्या...
वाळूज महानगरात उद्या २२३ मतदान केंद्रांवर मतदान; ८ गट, १४ गणांतील निवडणूक रणधुमाळी; ३७८ पोलीस-होमगार्ड तैनात 
हर्सूलच्या हरसिध्दीनगरातील शिवदत्तात्रय मंदिरात चोरी, CCVT त चोरटे कैद!, पहा चोरट्यांनी कशी केली चोरी...
वेरूळला महाशिवरात्रीनिमित्त यात्रा; वाहतूक मार्गात मोठे बदल
एमआयएमच्या ‘या’ १६ नगरसेवकांवर टांगती तलवार, कुणी आणले अडचणीत अन्‌ कोणत्या कारणास्तव, जाणून घेऊ...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software