चारचौघींची कमाल : मदतीच्या बहाण्याने येऊन ६० हजारांची पर्स केली गायब, औरंगपुरा भागातील नेवारे फर्निचरमध्ये घडली घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिल कार्नर ते औरंगपुरा रोडवरील सारस्वत बँकेजवळील नेवारे फर्निचर दुकानात मदत मागण्यासाठी आलेल्या चार महिलांनी हातसफाईने दुकानमालकिनीची पर्स गायब केली. या पर्समध्ये ५९ हजार ७०० रुपयांचा ऐवज होता. ही घटना गुरुवारी (४ फेब्रुवारी) सकाळी ११ च्या सुमारास समोर आली. सिटी चौक पोलिसांनी या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ज्योती राजू नेवारे (वय ५३, रा. अजबनगर विजय कॉलनी शिवाजी हायस्कूल रोड) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या मुलगा व सूनेसोबत राहतात. मिल कार्नर ते औरंगपुरा रोडवरील सारस्वत बँकेजवळ त्यांचे नेवारे फर्निचर दुकान आहे. गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास त्या व त्यांचा मुलगा प्रशांत दुकानात होते. दुकानात कामावर असलेला सनी शिंदे कामावर आला. तो साफसफाई करण्यासाठी दुकानाच्या पहिल्या मजल्यावर गेला. मुलगा व त्या तळमजल्यावर दुकानात असताना चार अनोळखी महिला दुकानात मदत मागण्यासाठी आल्या.

तेव्हा ज्योती यांनी त्यांना जायला सांगितले. त्यामुळे त्या दुकानातून गेल्या. त्यानंतर ११ वाजून ५ मिनिटांनी ज्योती यांच्या लक्षात आले की, दुकानातील काऊंटरजवळ खुर्चीवर ठेवलेली ग्रे रंगाची लेदरची पर्स दिसून आली नाही. या पर्समध्ये २७ हजार ७०० रुपये रोख, १२ हजारांची सोन्याची पोत, १० हजारांचे सोन्याची कानातील रिंग, १० हजारांचा मोबाइल, कपाटाच्या, मोपेडची चावी, सारस्वत बँक लॉकरची चावी, HDFC बँकेचे क्रेडीट कार्ड, HDFC बँकेचे एटीएम कार्ड, HDFC बँकेचे पासबुक, छत्रपती शाहू बँकेचे पासबुक, आधारकार्ड, पॅनकार्ड होते. त्या अनोळखी महिलांनी पर्स चोरल्याचा संशय आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सईद खान करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना

Latest News

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हुल का दिली, असे म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कमरेच्या...
वाळूज महानगरात उद्या २२३ मतदान केंद्रांवर मतदान; ८ गट, १४ गणांतील निवडणूक रणधुमाळी; ३७८ पोलीस-होमगार्ड तैनात 
हर्सूलच्या हरसिध्दीनगरातील शिवदत्तात्रय मंदिरात चोरी, CCVT त चोरटे कैद!, पहा चोरट्यांनी कशी केली चोरी...
वेरूळला महाशिवरात्रीनिमित्त यात्रा; वाहतूक मार्गात मोठे बदल
एमआयएमच्या ‘या’ १६ नगरसेवकांवर टांगती तलवार, कुणी आणले अडचणीत अन्‌ कोणत्या कारणास्तव, जाणून घेऊ...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software