राँग साइड रिक्षाने आधी दुचाकीला उडवले, नंतर कारने रिक्षाला ठोकरले, ४ जखमी, चिकलठाण्यातील जालना रोडवरील दुर्घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राँग साइड सुसाट निघालेल्या रिक्षाची धडक दुचाकीस्वाराला बसली. त्यानंतर रिक्षा अचानक थेट रस्‍त्‍यावर आल्याने समोरून येणारी कार रिक्षावर धडकली. गुरुवारी (५ फेब्रुवारी) रात्री ९ ला चिकलठाणा बाजारासमोर हा अपघात घडला. दोन्ही वाहने रस्‍त्‍यातच एकमेकांत अडकून पडल्याने जालना रोडवरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. नागरिकांच्या मदतीने वाहनेही बाजूला केली.

नक्की काय अन्‌ कसं घडलं...
रिक्षाचालक चिकलठाणा बाजार परिसरात राँग साइड जात होता. रिक्षाची धडक दुचाकीस्वाराला बसली. त्यामुळे दुचाकीस्वार दूरवर फेकला जाऊन जखमी झाला. यात रिक्षाचा तोल गेला अन्‌ अचानक रिक्षा रस्त्यावर आली. अचानक रिक्षा समोर आल्याने कारने रिक्षाला ठोकरले. कार केम्ब्रिज चौकाच्या दिशेने जात होती. कारची धडक बसताच रिक्षाचालकासह कारमधील तिघे जखमी झाले. रिक्षा चेंडूसारखी थेट रस्त्याच्या खाली जाऊन आदळली. काव्या बकाल (वय ७), कीर्ती बकाल (वय २२), किरण बकाल (वय २७) या जखमींवर मिनी घाटीत उपचार करण्यात आले. सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना

Latest News

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हुल का दिली, असे म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कमरेच्या...
वाळूज महानगरात उद्या २२३ मतदान केंद्रांवर मतदान; ८ गट, १४ गणांतील निवडणूक रणधुमाळी; ३७८ पोलीस-होमगार्ड तैनात 
हर्सूलच्या हरसिध्दीनगरातील शिवदत्तात्रय मंदिरात चोरी, CCVT त चोरटे कैद!, पहा चोरट्यांनी कशी केली चोरी...
वेरूळला महाशिवरात्रीनिमित्त यात्रा; वाहतूक मार्गात मोठे बदल
एमआयएमच्या ‘या’ १६ नगरसेवकांवर टांगती तलवार, कुणी आणले अडचणीत अन्‌ कोणत्या कारणास्तव, जाणून घेऊ...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software