मध्यरात्रीचा तरुण-तरुणीचा गोंधळ जरा विचित्रच होता...व्हिडीओ व्हायरल, नागेश्वरवाडीत नक्की काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : स्थळ नागेश्वरवाडी... तारीख ३१ जानेवारी, वेळ पहाटे साडेतीनची... रस्‍त्‍यावरच एक तरुण आणि तरुणीचा राडा सुरू... तब्बल १५ मिनिटे आरडाओरड, ओढाताण सुरू असताना... एका नागरिकाने खिडकीतून हटकले अन्‌ ते निघून गेले... या वेळी तरुणीच्या हाती शस्‍त्रासारखे काहीतरी दिसते...क्रांती चौक पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे दोघांची ओळख पटवली जात आहे.

नक्की काय घडलं...
या भागात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी होस्टेलमध्ये किंवा रूम करून राहतात. अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील तरुण दुचाकीने आला. तेवढ्यात एक तरुणी हातात शस्त्रसदृश वस्तू घेऊन तरुणाकडे धावली. जवळपास १५ मिनिटे त्यांच्यात वाद सुरू होता. तरुण हा तरुणीला रस्त्यावरून ओढत होता. बराच वेळ दोघांत झटापट चालली. त्यांच्या आरडाओरड्याने रहिवासी जागे झाले. त्यापैकी एका नागरिकाने खिडकीतून त्यांना हटकले. नंतर ते निघून गेले. दोघांचा व्हिडीओ ५ दिवसांनी व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात अद्याप कोणीही तक्रार देण्यासाठी समोर आलेले नाही. ते तरुण-तरुणी कोण होते, त्यांच्यात काय भांडण झाले होते, पहाटे साडेतीनला ते कसे असे रस्‍त्‍यावर आले, या प्रश्नांची उत्तरे त्यांना पोलिसांनी पकडल्यावरच मिळू शकतील. या घटनेमुळे शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुलींना सुरक्षित वाटण्यासाठी पोलिसांनी अशा विकृत प्रवृत्तीच्या तरुणांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. आता या प्रकरणात क्रांती चौक पोलीस आरोपीचा शोध घेऊन काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना

Latest News

हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना हुल का दिली म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना बेदम मारहाण, सिडकोतील लेमन ट्री हॉटेलजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हुल का दिली, असे म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कमरेच्या...
वाळूज महानगरात उद्या २२३ मतदान केंद्रांवर मतदान; ८ गट, १४ गणांतील निवडणूक रणधुमाळी; ३७८ पोलीस-होमगार्ड तैनात 
हर्सूलच्या हरसिध्दीनगरातील शिवदत्तात्रय मंदिरात चोरी, CCVT त चोरटे कैद!, पहा चोरट्यांनी कशी केली चोरी...
वेरूळला महाशिवरात्रीनिमित्त यात्रा; वाहतूक मार्गात मोठे बदल
एमआयएमच्या ‘या’ १६ नगरसेवकांवर टांगती तलवार, कुणी आणले अडचणीत अन्‌ कोणत्या कारणास्तव, जाणून घेऊ...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software