- News
- सिटी क्राईम
- आम्ही डॉन आहोत डॉन... रामनगरमध्ये ४ शाळकरी मुले कोयता दाखवून येणाऱ्या जाणाऱ्या धमकावत होती!; २ मुले
आम्ही डॉन आहोत डॉन... रामनगरमध्ये ४ शाळकरी मुले कोयता दाखवून येणाऱ्या जाणाऱ्या धमकावत होती!; २ मुले पोलिसांच्या ताब्यात, दोघांचा शोध सुरू
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरातील नशेखोरी आता तरुणांपर्यंतच मर्यादित राहिली नाही, ती शाळकरी मुलांमध्ये पसरली आहे. अल्पवयीन मुले नशेच्या अधीन जाऊन धारदार शस्त्रे दाखवून धमकावत असल्याचा धक्कादायक प्रकार रामनगरमध्ये बुधवारी (४ फेब्रुवारी) दुपारी १ च्या सुमारास घडला. आम्ही डॉन आहोत डॉन, असे म्हणून ही मुले येणाऱ्या जाणाऱ्या महिला, मुलांना धमकावत होते.
शाळकरी मुलांवर कुणाचा संशय जात नसल्याने घरात बिघडलेली मुले जाळ्यात ओढून त्यांना ड्रग्ज सप्लायर म्हणून ड्रग्ज माफिया वापरत असल्याची चर्चा परिसरात आहे. या प्रकारामुळे मुलांच्या सुरक्षेबाबत पालकांत चिंता निर्माण झाली असून, त्यांनी आपल्या पाल्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या पाल्याचे मित्र कोण मित्र आहेत, त्यांचे वर्तन- स्वभाव कसे आहेत, ते कधी कुठे असतात, याबाबत पालकांनी जागरूक राहण्याची गरज आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वेरूळला महाशिवरात्रीनिमित्त यात्रा; वाहतूक मार्गात मोठे बदल
By City News Desk
रोशन गेट भागातील अतिक्रमणे नागरिकांनी स्वतःहून घेतली काढून
By City News Desk
मुकुंदवाडीतील श्री समर्थ ज्वेलर्सला भीषण आग, लाखोंचे नुकसान
By City News Desk
Latest News
06 Feb 2026 19:13:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हुल का दिली, असे म्हणून दुचाकीस्वार ३ तरुणांना रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी कमरेच्या...

