गप्प करण्यासाठी गुन्हे दाखल करण्याचे कारस्थान, २० मिनिटे इम्तियाज जलील यांनी केला कोर्टात युक्तीवाद!; न्यायालयासमोर काय म्हणाले जलील...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ‘ॲट्रॉसिटी’च्या गुन्ह्यांतून मुक्त करावे, असा अर्ज एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी न्यायालयाकडे केला होता. त्यावर मंगळवारी (१० फेब्रुवारी) विशेष न्यायाधीश तथा अप्पर सत्र न्यायाधीश रा. दा. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. मात्र या प्रकरणात ‘आमचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय आदेश करू नये', असा अर्ज सरकारी वकील ॲड. सतीश मुंदवाडकर यांनी केल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला ठेवली आहे.

जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलांवर जमीन गैरव्यवहाराचे आरोप केले होते. हे आरोप करताना त्यांनी सरकारी कागदपत्राचे वाचन करताना आक्षेपार्ह शब्‍दाचा उच्चार केला होता. तो शब्द पकडून जलील यांच्याविरुद्ध बेगमपुरा व क्रांती चौक पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचे दोन गुन्हे ऑगस्ट महिन्यात दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांतून आपल्याला मुक्त करावे, यासाठी जलील यांनी स्वतःच २० मिनिटे युक्तीवाद करून आपली बाजू प्रभावीपणे मांडली.

मांझादेवी विरुद्ध ओंकारदीप अहलुवालिया तसेच कर्नाटकातील प्रकरणांचा दाखला त्यांनी युक्तीवादात दिला. केंद्र सरकारने राज्याच्या समाजकल्याण मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात नमूद बंदी असलेल्या शब्दाचा उल्लेख असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पत्रकार परिषदेत आपण केवळ सरकारी कागदपत्रांचे वाचन केले. आपला कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र मला गप्प करण्यासाठी गुन्हे दाखल करण्याचे कारस्थान रचले गेले, असे जलील यांनी सांगितले. दाखल तक्रारींमध्ये आपण मुस्लिम धर्माचे असल्याचेही नमूद केल्याकडे जलील यांनी लक्ष वेधले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; छत्रपती संभाजीनगरमध्ये मागवले प्रस्ताव

Latest News

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; छत्रपती संभाजीनगरमध्ये मागवले प्रस्ताव बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; छत्रपती संभाजीनगरमध्ये मागवले प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त- सदस्यांची संख्या...
जन्मले कमी अन्‌ दाखले वाटले जास्त; सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील अजब प्रकार; प्रशासन अचंबित, आता सगळीकडेच होणार तपासणी! 
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक लागून दुचाकीस्वाराचा मृत्यू, ढोरकीनवर शोककळा
दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागात पॉईंट्समॅन पदासाठी माजी सैनिकांची कंत्राटी पद्धतीने भरती
अर्ज-निवेदने, आंदोलने, कचरा कोंडीचा इशारा... आता महापालिकेच्या कंत्राटी कामगारांचा कायदेशीर लढा सुरू!; महापालिका वठणीवर येणार?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software