अजिंठा अर्बन बँक घोटाळा : सुभाष झांबड यांना सशर्त जामीन, दोन्ही गुन्ह्यांत मोठा दिलासा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील ठेवीदारांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणात बँकेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष झांबड यांच्याविरुद्ध दाखल दोन्ही गुन्ह्यांतही सशर्त जामीन मंजूर झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बँक अध्यक्ष सुभाष झांबड व संचालकांविरुद्ध २१ कोटींच्या बोगस ठेवी तारण दाखवून अपहार, फसवणूक केल्याचे दोन स्वतंत्र गुन्हे सिटी चौक पोलीस ठाण्यात २०२३ आणि २०२४ मध्ये दाखल झाले होते. पहिल्या गुन्ह्यात सर्वोच्‍च न्यायालयाने ३० जानेवारी २०२६ रोजी सशर्त जामीन मंजूर केला होता. खासदार आणि आमदारांच्या प्रकरणांचे विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश डी. पाटील यांनी दुसऱ्या गुन्ह्यातही एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर झांबड यांना सशर्त जामीन मंजूर केला. आदेश देताना अटी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार, झांबड यांनी न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये. खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयात नियमित हजर राहावे. पुढील आदेशापर्यंत वादग्रस्त अजिंठा अर्बन बँकेच्या परिसरात जाऊ नये किंवा बँकेच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये. सरकार पक्षाच्या पुराव्यात छेडछाड करू नये, असे बजावले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; छत्रपती संभाजीनगरमध्ये मागवले प्रस्ताव

Latest News

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; छत्रपती संभाजीनगरमध्ये मागवले प्रस्ताव बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; छत्रपती संभाजीनगरमध्ये मागवले प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त- सदस्यांची संख्या...
जन्मले कमी अन्‌ दाखले वाटले जास्त; सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील अजब प्रकार; प्रशासन अचंबित, आता सगळीकडेच होणार तपासणी! 
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक लागून दुचाकीस्वाराचा मृत्यू, ढोरकीनवर शोककळा
दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागात पॉईंट्समॅन पदासाठी माजी सैनिकांची कंत्राटी पद्धतीने भरती
अर्ज-निवेदने, आंदोलने, कचरा कोंडीचा इशारा... आता महापालिकेच्या कंत्राटी कामगारांचा कायदेशीर लढा सुरू!; महापालिका वठणीवर येणार?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software