आदल्या दिवशी वडिलांचे अंत्यसंस्कार करून दुसऱ्या दिवशी प्रगती १२ वीच्या पेपरला हजर!, डोळे पाणावलेलेच, म्हणाली, वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचेय..., छत्रपती संभाजीनगरातील भावूक प्रसंग...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सोमवारी (९ फेब्रुवारी) हृदयविकाराने ४९ वर्षीय वडिलांचे निधन झाले... त्यांचे अंत्यसंस्कार आटोपून दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (१० फेब्रुवारी) बारावीच्या परीक्षेला प्रगती सुहास यादव हिने छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरातील भास्कराचार्य ज्युनिअर कॉलेज या केंद्रावर हजेरी लावली. तिच्या या हिंमतीची सर्वांनीच दाद दिली...

प्रगतीचे वडील प्रा. डॉ. सुहास यादव (लोणीकर) कन्नड येथील संत तुकाराम महाविद्यालयात क्रीडा संचालक होते. त्यांच्यावर मूळ गावी लोणी (ता. परतूर, जि. जालना) येथे अंत्यसंस्कार पार पडले. अवघे शोकसागरा बुडालेले असताना हिंमतवान प्रगतीने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धाडस अंगी एकवटून परीक्षेला आली. वारंवार पाणावणारे डोळे, तरीही हिंमत न सोडता, स्वतः सावरत तिने पहिला इंग्रजीचा पेपर दिला. पेपर दिल्यानंतर केंद्राबाहेर आलेल्या प्रगतीने एका वृत्तपत्राला सांगितले, की माझ्या बाबांचे स्वप्न पूर्ण करणे हेच माझे अंतिम ध्येय आहे. त्यासाठी मी परीक्षा देईन आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण होईन. ती ‘जेईई’चीसुद्धा तयारी करत असून, तिला इंजिनिअर करण्याचे तिच्या वडिलांचे स्वप्न होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; छत्रपती संभाजीनगरमध्ये मागवले प्रस्ताव

Latest News

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; छत्रपती संभाजीनगरमध्ये मागवले प्रस्ताव बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; छत्रपती संभाजीनगरमध्ये मागवले प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त- सदस्यांची संख्या...
जन्मले कमी अन्‌ दाखले वाटले जास्त; सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील अजब प्रकार; प्रशासन अचंबित, आता सगळीकडेच होणार तपासणी! 
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक लागून दुचाकीस्वाराचा मृत्यू, ढोरकीनवर शोककळा
दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागात पॉईंट्समॅन पदासाठी माजी सैनिकांची कंत्राटी पद्धतीने भरती
अर्ज-निवेदने, आंदोलने, कचरा कोंडीचा इशारा... आता महापालिकेच्या कंत्राटी कामगारांचा कायदेशीर लढा सुरू!; महापालिका वठणीवर येणार?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software