ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक लागून दुचाकीस्वाराचा मृत्यू, ढोरकीनवर शोककळा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सुसाट निघालेल्या उसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक लागून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ढोरकीनच्या (ता. पैठण) अहिल्यानगर वसाहतीजवळ सोमवारी (१० फेब्रुवारी) सकाळी घडली. निजाम कडूभाई शेख (वय ६३, रा. ढोरकीन) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे.

निजाम शेख शेतातून दुचाकीने (एमएच २० इएन ४६७४) घरी निघाले होते. गावाजवळ पोहोचल्यानंतर अहिल्यानगर वसाहतीजवळ पैठण रस्ता ओलांडून घराकडे जात असतानाच पैठणहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या (क्र. एमएच १७ एई ८१०९) ट्रॉलीचा त्यांच्या दुचाकीला जोरदार धक्का बसला. यात निजाम शेख रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना जबर मार बसून ते गंभीर जखमी झाले. जोरदार आवाज झाल्याने तेथे धाव घेतलेल्या ग्रामस्थांनी आणि घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेथे पोहोचलेल्या पैठण एमआयडीसी पोलिसांनी तातडीने निजाम शेख यांना तत्काळ बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. निजाम शेख यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; छत्रपती संभाजीनगरमध्ये मागवले प्रस्ताव

Latest News

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; छत्रपती संभाजीनगरमध्ये मागवले प्रस्ताव बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; छत्रपती संभाजीनगरमध्ये मागवले प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त- सदस्यांची संख्या...
जन्मले कमी अन्‌ दाखले वाटले जास्त; सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील अजब प्रकार; प्रशासन अचंबित, आता सगळीकडेच होणार तपासणी! 
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक लागून दुचाकीस्वाराचा मृत्यू, ढोरकीनवर शोककळा
दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागात पॉईंट्समॅन पदासाठी माजी सैनिकांची कंत्राटी पद्धतीने भरती
अर्ज-निवेदने, आंदोलने, कचरा कोंडीचा इशारा... आता महापालिकेच्या कंत्राटी कामगारांचा कायदेशीर लढा सुरू!; महापालिका वठणीवर येणार?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software