- News
- सिटी क्राईम
- प्रेयसीसाठी काय पण... २५ वर्षीय रिक्षाचालकाने वृद्धेचा गळा दाबून लुटले साडेसात तोळे सोने!, शिवाजीनगर...
प्रेयसीसाठी काय पण... २५ वर्षीय रिक्षाचालकाने वृद्धेचा गळा दाबून लुटले साडेसात तोळे सोने!, शिवाजीनगरातील धक्कादायक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वृद्धेच्या घरात घुसून गळा दाबून हत्येचा प्रयत्न करत रिक्षाचालकाने साडेसात तोळे सोने लुटले. ही घटना सोमवारी (९ फेब्रुवारी) सायंकाळी शिवाजीनगरमध्ये घडली. आकाश माधव अंभोरे (वय २५, रा. शिवाजीनगर, मूळ रा. बुलडाणा) असे लुटारूचे नाव असून, त्याला पुंडलिकनगर पोलिसांनी अवघ्या ३ तासांत कमळापूर येथून अटक केली. आकाशला हॉटेल सुरू करून प्रेमविवाह करायचा होता. प्रेयसीसाठी हे कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली.
शहरात लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. शिवशंकर कॉलनीतील रहिवासी मानसिंग संत्रे (वय ७२) ९ फेब्रुवारीला हनुमाननगरातील मारुती मंदिरातून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या २ तोतया पोलिसांनी बनावट ओळखपत्र दाखवून त्यांची ८ ग्रॅम सोन्याची अंगठी दिशाभूल करून गायब केली. या प्रकरणात जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
१ गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिरात पती, मुलासह दर्शनासाठी आलेल्या सुरेखा भोपळे यांच्या गळ्यातील ५ ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्यांनी ८ फेब्रुवारीला लंपास केले. मंदिरातच दर्शनासाठी आलेल्या मीरा बोराडे यांचेही ३.५ ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरले.
२ विवेकानंद महाविद्यालयाच्या भागात सत्संगासाठी आलेल्या मीरा बकाल यांच्या गळ्यातील १४ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी ९ फेब्रुवारीला दुपारी लंपास केले. त्यांच्यासह सुशीला माकोल व अन्य भाविकांचेही मोबाईल, दागिने, रोख, मोबाईलही चोरीला गेले. क्रांतीचौक पोलिसांनी या सर्व चोरीच्या घटनांची नोंद केली.
३ हर्सूल येथील मनीषा गणेश साळवे ६ फेब्रुवारीला सायंकाळी हर्सूल टी पॉईंट येथून एसटी बसमध्ये बसल्या होत्या. त्यांच्या पर्समधील सोन्याचा १० ग्रॅमचा नेकलेस, १५ ग्रॅमची पोत व ४ ग्रॅमचे कानातले दागिने चोरट्याने लंपास केले. सावंगी गावाच्या पुढे बस गेल्यावर ही बाब लक्षात आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक लागून दुचाकीस्वाराचा मृत्यू, ढोरकीनवर शोककळा
By City News Desk
Latest News
11 Feb 2026 14:07:23
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्क्यांपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त- सदस्यांची संख्या...

