दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागात पॉईंट्समॅन पदासाठी माजी सैनिकांची कंत्राटी पद्धतीने भरती

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दक्षिण-मध्य रेल्वे नांदेड डिव्हीजनमार्फत पॉईंटसमॅन या पदासाठी माजी सैनिकांची कंत्राटी पध्दतीने भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी माजी सैनिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदासाठी वेतन १८ हजार रुपये, महागाई भत्ता, गाडी भत्ता, घर भत्ता ५ हजार रुपये, ड्रेस भत्ता (वार्षिक) व १० दिवस आकस्मिक सुट्टी लागू राहील. त्यासाठी माजी सैनिकाचे वय दिनांक १३/०१/२०२६ रोजी ५५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. किमान शिक्षण १० वी पास किंवा आयटीआय प्रमाणपत्र किवा नॅशनल अॅप्रेंटिस प्रमाणपत्र असावे, शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावे. इच्‍छुक माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात शुक्रवार, २० फेब्रुवारीपर्यंत नोंदवावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेमध्ये ०२४०-२३७०३१३ या क्रमांकावर संपर्क करावा.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; छत्रपती संभाजीनगरमध्ये मागवले प्रस्ताव

Latest News

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; छत्रपती संभाजीनगरमध्ये मागवले प्रस्ताव बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; छत्रपती संभाजीनगरमध्ये मागवले प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त- सदस्यांची संख्या...
जन्मले कमी अन्‌ दाखले वाटले जास्त; सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील अजब प्रकार; प्रशासन अचंबित, आता सगळीकडेच होणार तपासणी! 
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक लागून दुचाकीस्वाराचा मृत्यू, ढोरकीनवर शोककळा
दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागात पॉईंट्समॅन पदासाठी माजी सैनिकांची कंत्राटी पद्धतीने भरती
अर्ज-निवेदने, आंदोलने, कचरा कोंडीचा इशारा... आता महापालिकेच्या कंत्राटी कामगारांचा कायदेशीर लढा सुरू!; महापालिका वठणीवर येणार?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software