छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरती सुरू, १० दिवस चालणार प्रक्रिया, १५० पदे भरणार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्हा पोलीस दलातील भरतीला आजपासून (११ फेब्रुवारी) प्रारंभ झाला आहे. शहर पोलीस दलातील शिपाई पदाच्या १५० जागांसाठी सातारा परिसरातील एसआरपीएफ मैदान तर जिल्हा पोलिसांच्या ५३ पदांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गोकुळ मैदानावर १० दिवस भरती प्रक्रिया होणार आहे.

शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेद्वारे पोलीस शिपाई, वाहनचालक, पोलीस बँड्समन आदी पदांसाठी भरती होत आहे. उंची, छाती मोजणीनंतर १०० मीटर आणि १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर), गोळाफेक होईल. जिल्हा पोलीस दलात ४९ पोलीस शिपाई, ४ बँड्‌समन अशी एकूण ५३ पदे भरली जातील. यापैकी १८ पदे महिलांसाठी राखीव आहेत. ५३ जागांसाठी एकूण ४ हजार ३४१ अर्ज आले आहेत. शहर पोलीस दलाच्या १५० शिपाई पदांसाठी ७६९३ उमेदवारांनी अर्ज केले असून, यात १३०० पेक्षा अधिक मुलींचे अर्ज आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; छत्रपती संभाजीनगरमध्ये मागवले प्रस्ताव

Latest News

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; छत्रपती संभाजीनगरमध्ये मागवले प्रस्ताव बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान; छत्रपती संभाजीनगरमध्ये मागवले प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त- सदस्यांची संख्या...
जन्मले कमी अन्‌ दाखले वाटले जास्त; सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील अजब प्रकार; प्रशासन अचंबित, आता सगळीकडेच होणार तपासणी! 
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक लागून दुचाकीस्वाराचा मृत्यू, ढोरकीनवर शोककळा
दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागात पॉईंट्समॅन पदासाठी माजी सैनिकांची कंत्राटी पद्धतीने भरती
अर्ज-निवेदने, आंदोलने, कचरा कोंडीचा इशारा... आता महापालिकेच्या कंत्राटी कामगारांचा कायदेशीर लढा सुरू!; महापालिका वठणीवर येणार?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software