मायलेकाच्या नात्याला काळे फासले, आईनेच दिली मुलाची सुपारी, गंगापूर तालुक्यातील खुनाचे शॉक्ड करणारे सत्य आले समोर...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकभुर्जीवाघलगाव शिवारात ४७ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करून मृतदेह विहिरीत फेकण्यात आलेला होता. या खुनाचे गूढ अखेर शिल्लेगाव पोलिसांनी उकलले आहे. त्रास देतो म्हणून आईनेच मित्र आणि जावयाला सांगून मुलाचा काटा काढला. त्यासाठी मारेकऱ्याला ५० हजार रुपये देण्याचे आणि आधी घेतलेले पैसे माफ करण्याचेही आमिष दाखवले. पोलिसांनी दोन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे. संजय किसन सुलाने (वय ४७, रा. एकभुर्जी वाघलगाव, ता. गंगापूर) असे हत्‍या झालेल्याचे नाव आहे.

२६ जानेवारीला सायंकाळी सहाला एकभुर्जीवाघलगाव (शहानवाजपूर) गावाच्या शिवारातील कर्नावट यांच्या शेतातील विहिरीत ४७ वर्षीय संजयचा मृतदेह आढळला होता. त्याला कुणीतरी जीवे मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हात- पाय दोरीच्या साह्याने बांधून संपूर्ण शरीराला पांढऱ्या पन्नीत घालून पन्नीला दोरीने बांधून त्यात दगड घालून विहिरीच्या पाण्यात टाकून दिले होते. शिल्लेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला होता. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशावरून अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शिल्लगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सलीम चाऊस यांनी तपासाला गती दिली.

मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडे एकमेव आशेचा किरण होता, तो म्हणजे, मृतकाच्या अंगातील पँट... या पँटवरून ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्‍न सुरू केले. त्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांतील गोपनीय बातमीदारांना कामाला लावले. त्यावरून असे समोर आले, की एकभुर्जीवाघलगाव येथील संजय दोन- तीन दिवसांपासून बेपत्ता आहे, पण त्याच्या हरवल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आलेली नव्हती. पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात बोलावले. मात्र त्यांनी मृतदेह पाहून ओळखण्यास नकार दिला होता. त्यामुळे बेपत्ता व्यक्तीच्या आईचे डीएनए सॅम्पल घेऊन फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी मृतकाच्या आईचा सर्वात जवळचा मित्र गोरख शेकू आहिरे (रा. एकभुर्जी वाघलगाव) व जावई कमलसिंग साहेबसिंग सिंगल (रा. टाकळीवाडी) यांना संशयावरून ताब्‍यात घेतले. कसून चौकशीत त्यांनी तोंड उघडले...

...अन्‌ पोलीसही झाले शॉक्ड!
गोरखने पोलिसांना सांगितले, की संजयच्या आईनेच संजयचा खून करायला सांगितले होते. संजय मला खूप त्रास देत असून, त्याचा काटा काढा, असे सांगून तिने गोरखला धमकावले होते, की तू जर त्याचा काटा काढला नाही तर तुला तीस हजार रुपये दिले आहे ते २० टक्क्याने लावीन. तू माझ्या नात जावयाला मदतकामी सोबत घे, असेही तिने सांगितले होते. तू त्याचा काटा काढल्यानंतर आणखी पन्नास हजार रुपये देईल, असे आमिषही गोरखला संजयच्या आईने दिले होते. 

असा काढला काटा...
२३ जानेवारीला संध्याकाळी गोरखने संजयवर पाळत ठेवली. पोटूळ रेल्वेस्टेशनवर संजयला गोरखने गाठले. तिथून त्याला एकभुर्जीवाघलगाव जाणाऱ्या शिवरस्त्यावर नेले. तिथे कमलसिंगला बोलावून संजयला दारू पाजण्यात आली. नंतर डोक्यात व इतर ठिकाणी रॉडने मारून त्याची हत्‍या केली. नंतर मृतदेह पांढऱ्या पन्नीमध्ये बांधून कर्नावट यांच्या विहिरीत दगड बांधून टाकून दिले. पोलिसांनी गोरख आणि कमलसिंगला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक जी. बी. काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक डी. पी. गोंडे, महिला पोलीस अंमलदार झेड. ए. शेख, पी. के. भोपळे, पोलीस अंमलदार टी. व्ही. बेदरे, व्ही. के. बिघोत, शैलेश जेजुरकर, हनुमंत सातपुते, अर्जुन तायडे, संतोष शिरे यांनी केली. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मायलेकाच्या नात्याला काळे फासले, आईनेच दिली मुलाची सुपारी, गंगापूर तालुक्यातील खुनाचे शॉक्ड करणारे सत्य आले समोर...

Latest News

मायलेकाच्या नात्याला काळे फासले, आईनेच दिली मुलाची सुपारी, गंगापूर तालुक्यातील खुनाचे शॉक्ड करणारे सत्य आले समोर... मायलेकाच्या नात्याला काळे फासले, आईनेच दिली मुलाची सुपारी, गंगापूर तालुक्यातील खुनाचे शॉक्ड करणारे सत्य आले समोर...
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकभुर्जीवाघलगाव शिवारात ४७ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करून मृतदेह...
गंगापूरच्या भेंडाळ्याचा अंकुश यवतमाळमध्ये चालवायचा सेक्स रॅकेट!, अश्विनीसाठी करायचा घाणेरडे काम...
महत्त्वाची बातमी : समीर राजूरकर महापौरपदी विराजमान, बहुमताने निवड, उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ
औद्योगिक नगरीने मंत्री शिरसाटांच्या उमेदवार निवडीवर केले प्रश्नचिन्ह उभे!; मशाल पेटल्याने आत्मचिंतन होणार?
हर्सूलजवळ भीषण अपघात : दुभाजकाला धडकताच कार तिनदा उलटून ३० फूट उंच उडून तरुणांवर कोसळली!; एका तरुणाचा जागीच मृत्‍यू, दुसरा गंभीर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software