छ. संभाजीनगरात भाजपला धक्का; माजी महापौर राजू शिंदे जाणार उद्धव ठाकरे गटात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्‍या निवडणुकीत २०१९ मध्ये संजय शिरसाट यांना तुल्‍यबळ लढत देणारे आणि अवघ्या ४० हजार मतांनी पराभूत झालेले माजी महापौर राजू शिंदे लवकरच हाती शिवबंधन बांधणार आहेत. यामुळे भाजपचे काही प्रमाणात नुकसान होणार आहे. महायुतीत याहीवेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहण्याची शक्‍यता लक्षात घेऊन राजू शिंदे यांनी ठाकरे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्‍या निवडणुकीत २०१९ मध्ये संजय शिरसाट यांना तुल्‍यबळ लढत देणारे आणि अवघ्या ४० हजार मतांनी पराभूत झालेले माजी महापौर राजू शिंदे लवकरच हाती शिवबंधन बांधणार आहेत. यामुळे भाजपचे काही प्रमाणात नुकसान होणार आहे. महायुतीत याहीवेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहण्याची शक्‍यता लक्षात घेऊन राजू शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. राजू शिंदे यांच्यासोबतच त्‍यांचे समर्थक माजी नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारीही ठाकरे गटात जाणार असल्याने भाजपला हा धक्का मानला जात आहे. ठाकरे गटाकडून उमेदवारीचे आश्वासन पदरात पाडून घेत राजू शिंदे जात असतील तर संजय शिरसाट आणि त्‍यांच्यात येत्या विधानसभा निवडणुकीत चांढलीत लढत रंगणार आहे.

ठाकरे गटात जाण्याबद्दल एका वृत्त संकेतस्थळाशी बोलताना राजू शिंदे म्हणाले, की जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मी गेलो पाहिजे अशी कार्यकर्ते आणि नागरिकांची इच्छा आहे. भाजप आता फक्त शिंदे गटाचे काम करण्यासाठीच राहिली आहे असे आम्हाला वाटत आहे. लोकसभा निवडणुकीत सकारात्‍मक वातावरण असूनही भाजपला ही जागा सुटली नाही. दोन ते अडीच वर्षांपासून भाजपने येथे मेहनतीने काम केले होते. पण ही जागा शिंदे गटाला दिली गेली. लोकसभा निवडणुकीत आम्ही शिंदे गटाचे काम केले. पण शिंदे गटाच्या आमदार, खासदारांनी भाजपबद्दल साधी कृतज्ञताही व्यक्त केली नाही. त्‍यामुळे पश्चिम मतदारसंघात विकास करायचा असेल तर ठाकरे गटात जायला पाहिजेत या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत, असे ते म्‍हणाले.

दरम्‍यान, ठाकरे गटाकडून विधानसभेसाठी उमेदवारी मिळेल याच आश्वासनावर राजू शिंदे पक्षप्रवेश करण्याची शक्‍यता आहे. तसे झाले तर संजय शिरसाट यांच्यासाठी ही धोक्‍याची घंटा मानली जाईल. छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात सातारा देवळाई, पडेगाव, वडगाव कोल्हाटी, वळदगाव, बजाजनगर आदी परिसर येतो. विकासासाठी बरीच संधी या मतदारसंघात आहे. हीच बाब हेरून पुढील विधानसभा लढविण्याचा विचार राजू शिंदे करत असल्याची चर्चा आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना

Latest News

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
तलावात पोहताना दोन मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुर्घटना
करमाडजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकने ५ कामगारांना उडवले, तिघांचा जागीच मृत्‍यू, २ गंभीर
वाळूज MIDC तील ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिंसक वळण!; सोनवणेंना अक्षरशः ढकलत पोलिसांनी गाडीत बसवले, संतप्त नागरिकांनी मडके पोलिसांवर फेकले, हजार-दीड हजार लोकांचा पोलीस ठाण्याला घेराव
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software