आदित्‍य ठाकरे रविवार, सोमवार छत्रपती संभाजीनगरात; अंबादास दानवेंकडे ५ जिल्ह्यांची दिली जबाबदारी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे २५ आणि २६ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीची तयारी ठाकरे गटाकडून केली जात आहे. त्‍यासाठी बैठका घ्यायला आदित्य ठाकरे येणार आहेत. २५ ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजता संत एकनाथ रंगमंदिरात आदित्य ठाकरे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. २६ ऑगस्टला ग्रामीण भागात […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे २५ आणि २६ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीची तयारी ठाकरे गटाकडून केली जात आहे. त्‍यासाठी बैठका घ्यायला आदित्य ठाकरे येणार आहेत.

२५ ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजता संत एकनाथ रंगमंदिरात आदित्य ठाकरे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. २६ ऑगस्टला ग्रामीण भागात ते बैठका घेणार आहेत. दरम्‍यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची विभागीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या पाच जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघांत दानवे यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software