पोलीस शिपाई ते एएसआय... बनावट जातप्रमाणपत्र सादर करून पोलीस खात्यात ३५ वर्षे नोकरी!, अखेर आता गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पोलीस खात्यात ३५ वर्षे नोकरी, पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत बढती... मात्र हे सर्व बनावट जातप्रमाणपत्र सादर करून... नोकरी मिळवली, ती टिकवली अन्‌ वाढवली... पण आता सेवानिवृत्तीला काही महिने बाकी असताना नोकरीवर गंडांतर तर आलेच, पण शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हाही दाखल झाला आहे.

गफार सरवरखान पठाण (रा. एन १२, हडको, छत्रपती संभाजीनगर) असे या सहायक फौजदाराचे नाव आहे.  छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे नायब तहसीलदार कैलास वाघमारे यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून गफार सरवरखान पठाण (रा. एन १२, हडको, छत्रपती संभाजीनगर) यांच्या जात प्रमाणपत्राची चौकशी करण्याचा आदेश आला होता. त्यांनी पठाण यांच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्राची चौकशी केली. 

काय आहे प्रकरण
पठाण यांनी १३ ऑक्‍टोबर १९८९ रोजी तडवी जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले होते. मात्र त्यांचीच चुलत बहीण झेबा इद्रीस खान यांनी १८ मार्च २०२५ आणि २२ जुलै २०२५ रोजी जात पडताळणी समितीकडे अर्ज केला होता की, पठाण यांनी तडवी जातीचे खोटे जात प्रमाणपत्र प्राप्त करून पोलीस खात्यात नोकरी मिळवली आहे. पठाण यांनी जात प्रमाणपत्र मिळवताना तडवी जातीचे पुरावे सादर करताना खोटे शपथपत्र सादर केले होते. खोटे शपथपत्र सादर करून व कागदपत्रांचे बनावटीकरण करून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले.

नातेवाइक मुस्लिम, पठाण हे तडवी...
गफार पठाण यांच्या रक्तातील नातेवाइक काका, भाऊ, बहीण, चुलत भाऊ यांच्या कागदपत्रांत जातीची नोंद मुसलमान/मुस्लीम अशी आहे. मात्र पठाण यांच्या शालेय कागदपत्रांवरच वेगळ्या शाईने वेगळ्या हस्ताक्षरात तडवी हा शब्द नव्याने समाविष्ट केल्याचे समोर आले. त्यामुळे गफार सरवरखान पठाण यांच्याविरुद्ध नायब तहसीलदार कैलास वाघमारे यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. विशेष म्हणजे पोलीस दलातील सूत्रांच्या माहितीनुसार, ३१ जानेवारी २०२६ रोजी पठाण हे पोलीस दलातून सेवानिवृत्त होणार असून, त्याआधीच खोटे जातप्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत मुठाळ करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट

Latest News

कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात आज, २४ ऑक्टोबरला दुपारी उभ्या कारला अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला....
यवतमाळ हादरले!‌  मैत्रिणीसोबत यात्रोत्सवात आलेल्या १४ वर्षीय मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार!!
मुंबईत काचेच्या उंच इमारतीला भीषण आग!; सुदैवाने २७ जण बचावले, १७ जण होरपळले!! 
पतीच्या वागणुकीत कधीतरी बदल होईल, आशेवर जगत होती २४ वर्षीय तरुणी, तो दिवस उजाडलाच नाही, पण त्या दिवशी जे घडलं ते धक्कादायक...छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा पोलिसांनी ६ जणांविरुद्ध केलाय गुन्हा दाखल
हॉटेल चालवायला दिली, तो सर्व साहित्य घेऊन गायब..., हॉटेलमालकाची चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software