तिच्या लग्नाचा मार्ग मोकळा, वरून पोलीस संरक्षणही मिळणार!; घरातून पळून गेलेल्या तरुणीला कोर्टाचा दिलासा!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

मुंबई (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : कुटुंबाचा विरोध डावलून प्रियकरासोबत पळून गेलेल्या आणि आता गर्भवती असलेल्या तरुणीला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. एवढेच नव्हे तर प्रियकराशी विवाह करण्याची इच्छा असलेली ही तरुणी कुटुंबाकडून धोका असल्याचे सांगत असल्याने पोलिसांनी तिला सुरक्षा प्रदान करावी, असे आदेशच न्यायालयाने दिले.

मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३१ वर्षीय तरुणी काही दिवसांपूर्वी प्रियकरासोबत पळून गेली होती. याच दरम्यान तिच्या वडिलांनी मुलगी हरवल्याचा दावा करत न्यायालयात हेबियस कॉर्पस (व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करण्याची विनंती करणारी याचिका) दाखल केली होती. सध्या महाराष्ट्राबाहेर राहणारी ही तरुणी याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर झाली. या वेळी आपण स्वतःहून घर सोडल्याचे आणि कुटुंबाचा प्रेमाला विरोध व त्यांच्यापासून धोका असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. सध्या आपण तीन महिन्यांची गर्भवती असून, आपल्याला जोडीदाराशी विवाह करायचा आहे, असेही तिने स्पष्ट केले होते.

यानंतर न्या. सारंग कोतवाल आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने ही याचिका निकाली काढली. तरुणी प्रौढ असून, तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तिच्या नात्याला कुटुंबाचा विरोध असला तरी तिला तिच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे पूर्णतः स्वातंत्र्य आहे. तिने कुटुंबाकडून धोका असल्याची भीती व्यक्त केली असल्याने तिच्या सुरक्षेची खात्री करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करीत न्यायालयाने वाकोला पोलिसांना त्या तरुणीला सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश दिले. वाकोला पोलिसांनी सध्या ती तरुणी राहत असलेल्या भागातील पोलिसांशी संपर्क साधून तिच्या सुरक्षेची व्यवस्था करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...

Latest News

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला... एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएमजवळ अंधारात लपून बसलेल्या तिघांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software