मुंबईत काचेच्या उंच इमारतीला भीषण आग!; सुदैवाने २७ जण बचावले, १७ जण होरपळले!! 

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

मुंबई (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मुंबईतील जोगेश्वरीच्या ब्रह्मपाडा परिसराने गुरुवारी (२३ ऑक्‍टोबर) मोठ्या आगीचा थरार अनुभवला. एस.व्ही. रोडवरील जे.एन.एस बिझनेस सेंटर या उंच काचेच्या इमारतीत आग लागली आणि एकच धावाधाव झाली. क्षणार्धात नवव्या मजल्यापासून तेराव्या मजल्यापर्यंत वाढलेल्या या आगीमुळे धुराचे प्रचंड लोट उसळले. अग्निशमन दलाने तब्बल चार तासांचा लढा देऊन ही आग विझवली. नशीब बलवत्तर होते म्हणून २७ जण या आगीतून बचावले तर धुरामुळे श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने १७ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी १०: ४१ वाजता जे.एन.एस. बिझनेस सेंटरच्या नवव्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही संपूर्ण इमारत काचेची असल्याने आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी जागाच नसल्याने आग काही मिनिटांतच तेराव्या मजल्यापर्यंत पोहोचली. आग लागली त्यावेळी शेकडो लोक दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने या बिझनेस सेंटरमध्ये आलेले होते. आग लागल्यावर हे सगळे जण आत अडकून पडले. आगीचा वेग इतका होता की अवघ्या काही मिनिटांत या इमारतीत असलेल्या विविध व्यावसायिक कार्यालयातील वायरिंग, डक्ट, प्रकल्प फॉल सिलिंग, फर्निचर, कागदपत्रे, कॉम्प्युटर आदी  काही क्षणांतच खाक झाले. आगीचा प्रभाव वाढत असल्याचे पाहून काही जणांनी तत्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधला.

Inferno-at-1761261909871_d (1)

काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता पाहून अग्निशमन दलाने ही आग लेव्हल तीनची असल्याचे जाहीर केले होते. आग रौद्ररूप धारण करीत असल्याने बेस्ट प्रशासनाला या परिसरातील बस वाहतूक वळवावी लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत कठोर परिश्रम घेऊन ही आग विझवण्यासाठी त्यांना तब्बल चार तास लागले. तोपर्यंत अनेक महिला आणि पुरुष या बिझनेस सेंटरमध्ये आगीत अडकून पडले होते. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी शिड्या आणि हायड्रोलिक प्लॅटफॉर्म लॅडरचा वापर करून दोन महिलांसह एकूण २७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले. यातील १७ जणांवर अद्यापही जोगेश्वरीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट

Latest News

कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात आज, २४ ऑक्टोबरला दुपारी उभ्या कारला अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला....
यवतमाळ हादरले!‌  मैत्रिणीसोबत यात्रोत्सवात आलेल्या १४ वर्षीय मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार!!
मुंबईत काचेच्या उंच इमारतीला भीषण आग!; सुदैवाने २७ जण बचावले, १७ जण होरपळले!! 
पतीच्या वागणुकीत कधीतरी बदल होईल, आशेवर जगत होती २४ वर्षीय तरुणी, तो दिवस उजाडलाच नाही, पण त्या दिवशी जे घडलं ते धक्कादायक...छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा पोलिसांनी ६ जणांविरुद्ध केलाय गुन्हा दाखल
हॉटेल चालवायला दिली, तो सर्व साहित्य घेऊन गायब..., हॉटेलमालकाची चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software