कविता अन्‌ वंदना... लेडीज विअर कपड्याच्या दुकानात शिरल्या... पुढे केला हा कारनामा!; दुकानमालकाने CCTVमध्ये सारंच पाहिलं... औरंगपुऱ्यातील घटना

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : औरंगपुऱ्यातील मान्या लेडीज विअर कपड्यांच्या दुकानात आगळीकच घडली. २ महिला ग्राहक बनून आल्या. पिशवीत ड्रेस भरले. पैकी एक जण बाहेर पडली अन्‌ निघूनही गेली. दुसरी दुकानाबाहेर पडत असताना दुकानमालकाने संशयावरून थांबवले अन्‌ दोघींचे बिंग फुटले. ही घटना सोमवारी (२० ऑक्‍टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

कविता माधव रोडे (रा. गल्ली नं.१ विश्रांतीनगर, मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर) व वंदना रामराव देठवे (रा. रेल्वे गेट नं. ५६ राजनगर, छत्रपती संभाजीनगर ) अशी या महिलांची नावे आहेत. प्रेमसिंग हरीसिंग राव (वय २७, चालक, रा. मु. कोडीटा, पो. गजीपुरा, तहसील जसवंतपुरा, जि. जालोर, राज्य- राजस्थान, ह. मु. गोमटगिरी, पैठणगेट, छत्रपती संभाजीनगर) या व्यावसायिकाने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्याने औरंगपुऱ्यात १५ ऑक्‍टोबरला मान्या लेडीज विअर कपड्याचे दुकान सुरू केले आहे. त्याच्या दुकानात कामगार रतनसिंग हरीसिंग, लक्ष्मणसिंग, महिपालसिंग, प्रेम शंकर, अमरसिंग भिकसिंग, ईश्वर, विक्रम असे काम करतात.

यापैकी रतनसिंग, लक्ष्मणसिंग व दुकानमालक  प्रेमसिंग हे ग्राहकांना कपडे दाखवतात. कपडे पसंत पडल्यानंतर ग्राहकासह कामगार येऊन काऊंटरवर बिल करतात. सोमवारी (२० ऑक्‍टोबर) दुकानात गर्दी असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोन महिला दुकानात आल्या. पैकी एक महिला निघून गेली. दुसरी महिला पिशवीसह बिल न फाडता जात असताना प्रेमसिंगला संशय आला. त्याने तिची पिशवी पाहिली असता त्यात चार ड्रेस मिळून आले. आपल्याच दुकानातील असल्याचे लक्षात आल्यावर प्रेमसिंगने महिलेला नाव विचारले असता तिने तिचे नाव कविता रोडे असे सांगितले.

त्यानंतर प्रेमसिंगने सीसीटीव्ही फूटेज पाहिले असता तिच्यासोबत आलेली एक महिलासुध्दा दुकानातील ड्रेस चोरून घेऊन गेल्याचे दिसले. पळून गेलेल्या महिलेचे नाव वंदना देठवे असल्याचे समोर आले. त्यानंतर प्रेमसिंगने कविताला घेऊन सिटी चौक पोलीस ठाणे गाठले. वंदनाने ४५ हजार रुपयांचे १५ ड्रेस (प्रत्येकी किंमत ३ हजार), ४ हजार २०० रुपयांचे ६ ड्रेस (प्रत्येकी किंमत ७०० रुपये) असे एकूण ४९ हजार २०० रुपयांचे कपडे चोरून नेल्याचे समोर आले. प्रेमसिंगच्या तक्रारीवरून कविता व वंदनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक फौजदार सईद खान करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट

Latest News

कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात आज, २४ ऑक्टोबरला दुपारी उभ्या कारला अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला....
यवतमाळ हादरले!‌  मैत्रिणीसोबत यात्रोत्सवात आलेल्या १४ वर्षीय मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार!!
मुंबईत काचेच्या उंच इमारतीला भीषण आग!; सुदैवाने २७ जण बचावले, १७ जण होरपळले!! 
पतीच्या वागणुकीत कधीतरी बदल होईल, आशेवर जगत होती २४ वर्षीय तरुणी, तो दिवस उजाडलाच नाही, पण त्या दिवशी जे घडलं ते धक्कादायक...छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा पोलिसांनी ६ जणांविरुद्ध केलाय गुन्हा दाखल
हॉटेल चालवायला दिली, तो सर्व साहित्य घेऊन गायब..., हॉटेलमालकाची चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software