मविआत बिघाडी!; काँग्रेस म्हणतेय, राज तर नकोच पण आता उद्धव ठाकरेही नकोत!, स्वतंत्र लढण्याचा मनसुबा!

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

मुंबई (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने दोघांच्याही पक्षांमध्ये उत्साह संचारला असला तरी या दोघांच्या युतीचे साईड इफेक्ट्स महाविकास आघाडीत उमटू लागले आहेत. राज ठाकरे यांच्या एन्ट्रीने महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले असून, या आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसने केवळ मनसेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येत्या निवडणुकीत शिवसेना- मनसे सोबत जाऊ नये अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे सांगत शिवसेनेच्या ठाकरे गटापासून घटस्फोट घेण्याचे मनसुबे बोलून दाखवले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेणे बंधनकारक आहे. असे असले तरी राज्य निवडणूक आयोगाने अद्याप या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केलेला नाही. सोबतच कोणकोणते पक्ष एकत्र आणि कोणते पक्ष स्वतंत्र लढून या निवडणुकांना सामोरे जाणार हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी महायुतीतील तिन्ही पक्ष मुंबई मध्ये एकत्र तर इतर शहरात स्वतंत्रपणे लढतील, असे संकेत दिले होते. त्याचवेळी महाविकास आघाडीत मात्र मनसेसह एकत्र येण्याची शक्यता जवळपास मावळली असल्याचे संकेत काँग्रेसच्या वतीने देण्यात येत आहेत.

मुंबईत राज ठाकरे नव्हे तर उद्धव ठाकरेंसोबतही काँग्रेस जाणार नाही, असा दावारुपी बॉम्ब काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना फोडला होता. त्या पाठोपाठ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही बुलडाणा येथे बोलताना या अनुषंगाने रोखठोक भाष्य केले. मनसेच नव्हे तर शिवसेनेला सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढू नये, अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना आहे, असे सपकाळ यांनी सांगितले. त्याचवेळी काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही काँग्रेस महाविकास आघाडीतून स्वतंत्र होऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. सपकाळ, जगताप आणि गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे आगामी कालावधीत शिवसेनेसोबत काँग्रेसचा घटस्फोट निश्चित मानला जात असून, यातून महाविकास आघाडीत फाटाफूट होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट

Latest News

कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात आज, २४ ऑक्टोबरला दुपारी उभ्या कारला अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला....
यवतमाळ हादरले!‌  मैत्रिणीसोबत यात्रोत्सवात आलेल्या १४ वर्षीय मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार!!
मुंबईत काचेच्या उंच इमारतीला भीषण आग!; सुदैवाने २७ जण बचावले, १७ जण होरपळले!! 
पतीच्या वागणुकीत कधीतरी बदल होईल, आशेवर जगत होती २४ वर्षीय तरुणी, तो दिवस उजाडलाच नाही, पण त्या दिवशी जे घडलं ते धक्कादायक...छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा पोलिसांनी ६ जणांविरुद्ध केलाय गुन्हा दाखल
हॉटेल चालवायला दिली, तो सर्व साहित्य घेऊन गायब..., हॉटेलमालकाची चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software