‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी खासगी होस्टेलमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाले आहे. सकाळपासून तिने वडिलांचे कॉल उचलले नाहीत. नंतर मेसवरही जेवण करण्यासाठी आली नसल्याचे कळले. त्यामुळे तिचे वडील छत्रपती संभाजीनगरला आले. सोबतच्या मुलींनी सांगितले, की आम्ही सकाळी ८ ला क्लासला गेलो, त्यानंतर ती रूमवर एकटीच झोपलेली होती... क्रांती चौक पोलिसांनी तिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करून कसोशीने शोध घेतला जात आहे.

मुलगी मूळची बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील एका गावातील असून, ती सिंदखेड राजा येथील कॉलेजमध्ये ११ वी सायन्सला शिकते. नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी महात्‍मा फुले चौकातील एका खासगी क्‍लासेसमध्ये जाते. ती औरंगपुऱ्यातील खासगी होस्टेलमध्ये रूम करून राहते. गुरुवारी (१२ फेब्रुवारी) सकाळी ११ ला वडिलांनी कॉल केला तेव्हा तिने उचलला नाही. वडिलांनी काही वेळाने परत लावला, तरीही तिने उचलला नाही. त्यानंतर दुपारी साडेबाराला मेसवाल्या महिलेने तिच्या वडिलांना कॉल करून सांगितले, की तुमची मुलगी आज जेवायला आली नाही.

संपर्क होत नसल्‍याने तिचे वडील तातडीने छत्रपती संभाजीनगरला आले आणि होस्टेलवरील मुलींना विचारणा केली. त्यावेळी मुलींनी सांगितले, की आम्‍ही सकाळी आठला क्‍लासला गेलो तेव्हा ती एकटीच रूमवर झोपलेली होती. ती नंतर कुठे गेली, हे आम्हाला माहीत नाही. क्‍लासमधील शिक्षकांनी सांगितले, की ती चार-पाच दिवसांपासून क्‍लासलाही आलेली नाही.  तिचे कुणीतरी अपहरण केल्याची शक्‍यता तिच्या वडिलांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार करताना व्यक्त केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार संगीत खंडाळकर करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...

Latest News

‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की... ‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी खासगी होस्टेलमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाले...
‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश, २४५० एचपीव्ही लसी मिळणार
महिलेच्या बोलण्याला भाळून केलेली १७ लाखांची गुंतवणूक अंगलट, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार
फुलंब्रीत माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
आम्ही भाजप-शिंदे गटाच्या दारात जाणार नाही; तेच आमच्या दारात येतील; शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा दावा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software