एकाग्रता येत नव्हती, मन चलबिचल राहायचं... एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेमुळे समस्या झाली दूर, राऊत यांनी सांगितला अनुभव..., छत्रपती संभाजीनगर आज आहे कार्यशाळा...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मन चलबिचल राहायचं, कोणत्या गोष्टीवर फोकस करता येत नव्हतं. संमोहनशास्‍त्र तज्‍ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेत आल्याने माझी ही समस्या दूर झाली. ही कार्यशाळा सर्वांसाठी उपयुक्त असून, कोणाला काही समस्या असतील त्यांनाही आणि कुणाला समस्या नसतील त्यांनाही कार्यशाळा लाभदायी आहे, असा अनुभव संदीप राऊत यांनी व्यक्त केला.

आज होणार ही कार्यशाळा...
आज, १५ फेब्रुवारीला सायंकाळी ७ ते ९ दरम्‍यान ही कार्यशाळा आकृती आर्केड (अंडर ग्राऊंड हॉल ) महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर, वरद गणेश मंदिराशेजारी, समर्थनगर येथे होणार आहे. कार्यक्रमाला प्रवेश मोफत असून 8087492943 किंवा 9850170936 या नंबरवर कॉल करून नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. अनेक विद्यार्थी संमोहनशास्त्र ब्रेन प्रोग्रामिंग तंत्रामुळे स्मरणशक्ती विकास, स्टेज डेअरिंग, परीक्षेची भीती अशा समस्यांतून मुक्त होत आहेत. अनेक उपचार करूनही कुठेच बरे न झालेल्या आजारावर येथे फायदा होत आहे.

कोणकोणत्या समस्यांवर लाभ?
मन एकाग्र होत नाही, स्मरण शक्ती व आत्मविश्वासाचा अभाव, सतत राग व चिडचिडेपणा, नकारात्मक, नको ते विचार सतावतात, परीक्षा, इंटरव्ह्यू, सेमिनार, ओरलची भीती, कळतंय पण वळत नाही अशी स्थिती, मानवी स्नेह संबंध जमत नाही, डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, चिंता, घरात अशांती, नोकरी तसेच व्यवसायात अपयश अशा एक ना अनेक समस्यांवर लाइफ कोच एस. के. नांदेडकर यांची कार्यशाळा रामबाण ठरत आहे. कार्यशाळेबद्दल सुप्रसिद्ध संमोहन तज्‍ज्ञ एस. के. नांदेडकर यांनी सांगितले, की मानसिक क्षमतांचा विकास अत्यंत महत्वाचा आहे. स्पर्धात्मक युगात आपण आपल्या पाल्यांच्या मानसिक क्षमतांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. धैर्य, हिंमत, चिकाटी, स्टेज डेअरिंग, स्‍ट्रेस मॅनेजमेंट, स्टडी मॅनेजमेंट, हॅबिट मॅनेजमेंटअभावी अनेक मुले आज संपूर्ण मानसिकता बिघडून बसत आहेत. व्यसनाधीन होत आहेत. त्‍यांना नवे आयुष्य प्रदान करणारा, त्‍यांच्या मानसिक क्षमता विकासित करणारा करणारा सुपर माईंड पॅावर कार्यक्रम आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...

Latest News

‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की... ‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी खासगी होस्टेलमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाले...
‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश, २४५० एचपीव्ही लसी मिळणार
महिलेच्या बोलण्याला भाळून केलेली १७ लाखांची गुंतवणूक अंगलट, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार
फुलंब्रीत माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
आम्ही भाजप-शिंदे गटाच्या दारात जाणार नाही; तेच आमच्या दारात येतील; शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा दावा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software