आम्ही भाजप-शिंदे गटाच्या दारात जाणार नाही; तेच आमच्या दारात येतील; शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा दावा

जिल्हा परिषदेत नवीन समीकरणे जुळणार का? याची उत्सुकता

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. उद्धव ठाकरे गटाला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बऱ्यापैकी यश मिळाले आहे. त्यांच्या गटाचे जिल्हा परिषदेत ९ आणि पंचायत समितीत ११ सदस्य निवडून आले. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. तथापि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सत्तेसाठी आम्ही त्यांच्या दारात जाणार नाही. उलट तेच आमच्याकडे येऊ शकतात, अशी गुगली टाकल्याने आगामी काळात कोणत्या घडामोडी घडणार याची उत्सुकता लागली आहे.

पत्रकारांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, की सिल्लोड वगळता सर्व तालुक्यांत आमच्या पक्षाला चांगले प्रतिनिधीत्व मिळाले. पदाधिकाऱ्यांच्या निवडीत शिवसेनेचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. पक्षाच्या निर्णयाविरोधात कुणी वैयक्तिक पाठिंबा दिला, तर तो गंभीरपणे विचारात घेतला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

शिवसेना सगळ्यांना घेऊन सत्तेत येऊ शकते...
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता जिल्हा परिषद सदस्यांना फोन करत आहेत. त्यांच्या पुतण्याला अध्यक्ष करण्यासाठी पाठिंबा मागत आहेत. त्यांनी शासकीय नोकरी सोडून भाजपच्या सक्रिय राजकारणात यावे, असा टोला दानवे यांनी लगावला. शिवसेना सगळ्यांना एकत्र घेऊन सत्तेत येऊ शकते. राजकीय कारणास्तव शिवसेनेला काही लोक पाठिंबा देऊ शकतात, असा दावाही दानवे यांनी केला.

भाजप, सेनेचे पदाधिकारी उद्धव सेनेच्या संपर्कात
उद्धव सेनेला सोबत घेतल्यास भाजप आणि शिवसेनादेखील सत्तेत बसू शकते. असे केल्यास उद्धवसेनेसोबत जास्त बार्गेनिंग करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी उद्धवसेनेसोबत संपर्क करत आहेत. उद्धवसेनादेखील पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहे. उद्धवसेनेच्या सदस्यांनीदेखील सत्तेसोबत राहिल्यास निधी मिळेल आणि पक्ष मजबूत करता येईल. अशी भूमिका घेतली असल्याचा राजकीय सूत्रांचा दावा आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...

Latest News

‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की... ‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी खासगी होस्टेलमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाले...
‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश, २४५० एचपीव्ही लसी मिळणार
महिलेच्या बोलण्याला भाळून केलेली १७ लाखांची गुंतवणूक अंगलट, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार
फुलंब्रीत माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
आम्ही भाजप-शिंदे गटाच्या दारात जाणार नाही; तेच आमच्या दारात येतील; शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा दावा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software