महिलेच्या बोलण्याला भाळून केलेली १७ लाखांची गुंतवणूक अंगलट, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एका बड्या इव्हेंट कंपनीत गुंतवणूक करून दामदुप्पट पैसे परत करू, असे आमिष दाखवून पुण्याच्या बहीण-भावाने मिळून हडकोतील एका तरुणाला तब्बल १७ लाख ५१ हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून संजना देवीदास चौधरी व सुयश देवीदास चौधरी (दोघे रा. व्हिस्टा रेसिडेन्सी, बाणेर, पुणे) यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शहरातील ३३ वर्षीय तरुण खासगी कंपनीत नोकरी करतो. पुण्यातील एका बँकेत त्याची संजनासोबत ओळख झाली. संवाद वाढल्याने मैत्री झाली. तेव्हा संजनाने तिच्या इव्हेंट कंपनीबाबत माहिती दिली. एके दिवशी मुथूट ग्रुपच्या मोठ्या इव्हेंटचे काम आल्याचे सांगून तरुणाला गुंतवणूक करण्यासाठी गळ घातली. त्यानेही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून २० मार्च ते २७ मार्चदरम्यान एकूण ५ लाख रुपये पाठवले. त्यावर बरोबरीचे नफा वाढून घेण्याबाबत संजनाने करारपत्र केले. १२ मे २०२५ रोजी एका वृत्तपत्राचा मोठा इव्हेंट मिळाल्याचे सांगून २१ मे रोजी पुन्हा तरुणाकडून ३ लाख ४० हजार रुपये घेतले.

सातत्याने उकळले पैसे; भावाच्या खात्यावर ट्रान्सफर
संजनाने त्यानंतर तरुणाला विविध मोठ्या कंपन्यांच्या इव्हेंटचे कारण सांगून जून २०२५ पर्यंत १७ लाख ५१ हजार रुपये उकळले. नंतर मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ केली. वडिलांचे निधन झाल्याचे सांगूनही तिने वेळ मारून नेली. तरुणाने पैशांसाठी तगादा लावल्यावर संजना व सुयशने त्यांना वारंवार काही रकमांचे धनादेश दिले. मात्र, त्यातील एकही वटला नाही. सर्व इव्हेंट कामांच्या तिने बनावट ऑर्डर तयार करून तरुणाला पाठवून फसविले. विशेष म्हणजे, ही सर्व रक्कम तिने भाऊ सुयश व आईच्या बँक खात्यावर पाठवल्याचेही नंतर उघडकीस आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...

Latest News

‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की... ‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी खासगी होस्टेलमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाले...
‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश, २४५० एचपीव्ही लसी मिळणार
महिलेच्या बोलण्याला भाळून केलेली १७ लाखांची गुंतवणूक अंगलट, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार
फुलंब्रीत माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
आम्ही भाजप-शिंदे गटाच्या दारात जाणार नाही; तेच आमच्या दारात येतील; शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा दावा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software