- News
- सिटी डायरी
- फुलंब्रीत माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
फुलंब्रीत माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : फुलंब्री येथे भाजप कार्यकर्त्यांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. येथे माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी सदस्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. पण या सत्कार सोहळ्यात नेते मंडळींसमोर कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, आरोप-प्रत्यारोप व घोषणाबाजीचे दर्शन घडले. अखेर दानवेंसह इतर नेत्यांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांत केले. परंतु या प्रकाराने सत्कार सोहळ्याला वादाचे गालबोट लागल्याचे दिसून आले.
वातावरण तणावपूर्ण झाल्याचे पाहून माजी खासदार रावसाहेब दानवे आणि आमदार अनुराधा चव्हाण यांनी तात्काळ हस्तक्षेप केला. दानवे यांनी कार्यकर्त्यांना शांत करत, ‘पक्ष संघटना ही व्यक्तीपेक्षा मोठी आहे, आपले मतभेद घरामध्येच मिटवा', असे आवाहन केले, तसेच पराभवाचे आत्मचिंतन करून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, अशा सूचना त्यांनी केल्या. नेत्यांच्या मध्यस्थीनंतर गोंधळ थांबला असला, तरी कार्यकर्त्यांमधील धुसफूस कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
महिलेच्या बोलण्याला भाळून केलेली १७ लाखांची गुंतवणूक अंगलट, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार
By District Correspondent
फुलंब्रीत माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
By District Correspondent
आम्ही भाजप-शिंदे गटाच्या दारात जाणार नाही; तेच आमच्या दारात येतील; शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा दावा
By District Correspondent
वाळूज महानगरात चोरट्यांची हिंमत तर पहा, महिलेला मारहाण करून हिसकावले मंगळसूत्र
By District Correspondent
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
By City News Desk
Latest News
15 Feb 2026 20:06:19
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी खासगी होस्टेलमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाले...

