२० वर्षीय तरुणाचा नारंगी धरणात बुडून मृत्‍यू, वैजापूर तालुक्यातील खळबळजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूरजवळील नारंगी धरणात बुडून २० वर्षीय तरुणाचा मृत्‍यू झाला. ही घटना शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी १ च्या सुमारास घडली. खुशाल रवींद्र गायकवाड (रा. एन. एम. सी. कॉलनी, वैजापूर) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे.

शुक्रवारी रात्री ११ ला खुशाल घरातून बाहेर पडला होता. रात्रभर घरी न आल्याने शनिवारी सकाळी कुटुंबियांनी शोध सुरू केला. खुशालची दुचाकी नारंगी धरणाच्या परिसरात उभी असल्याचे दिसले. संशयावरून धरणाच्या पाण्यात शोध घेतला. दुपारी १ ला मृतदेह पाण्यावर तरंगून आला. वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. खुशालने आत्‍महत्‍या केली, की तलावात पडून मृत्‍यू झाला, हे अद्याप समोर आलेले नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...

Latest News

‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की... ‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी खासगी होस्टेलमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाले...
‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश, २४५० एचपीव्ही लसी मिळणार
महिलेच्या बोलण्याला भाळून केलेली १७ लाखांची गुंतवणूक अंगलट, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार
फुलंब्रीत माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
आम्ही भाजप-शिंदे गटाच्या दारात जाणार नाही; तेच आमच्या दारात येतील; शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा दावा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software