शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार गणेश गायकवाड याने वरिष्ठांच्या नावे तब्बल १४ लाख रुपयांची मागणी केली. या मागणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शनिवारी (१४ फेब्रुवारी) त्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले, तर बेगमपुऱ्याचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. बुद्ध लेणी परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात आरोपींच्या यादीतून नाव काढून कारवाई टाळण्यासाठी ही लाच मागण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ऐतिहासिक बुद्ध लेणीलगत गौणखनिजाचे सर्रास अवैध उत्खनन केले जाते. मुरुमासाठी ब्लास्टिंग केले जाते. जेसीबी, पोकलेनने टेकड्या फोडल्या जात आहेत. यासंदर्भात वृत्तपत्रांत बातम्या आल्यानंतर न्यायालयाने कठोर कारवाई करून पोलिसांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर महसूल अधिकारी दगडू जरारे यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात अवैध उत्खनन प्रकरणी जीवनलाल डोंगरे, पृथ्वीराज डोंगरे, प्रेमराज डोंगरे, हंसराज डोंगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अंमलदार गायकवाडने यात काहींना आरोपी न करण्यासाठी १४ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. एका कारमध्ये गायकवाड हा त्या व्यक्तींना पैशांची मागणी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गायकवाडला तडकाफडकी निलंबित केले, तर पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. अंतर्गत विभागीय चौकशी सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख करणार आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...

Latest News

‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की... ‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी खासगी होस्टेलमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाले...
‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश, २४५० एचपीव्ही लसी मिळणार
महिलेच्या बोलण्याला भाळून केलेली १७ लाखांची गुंतवणूक अंगलट, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार
फुलंब्रीत माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
आम्ही भाजप-शिंदे गटाच्या दारात जाणार नाही; तेच आमच्या दारात येतील; शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा दावा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software