‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश, २४५० एचपीव्ही लसी मिळणार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा विस्तार सुरू असून, पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांनंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचाही अधिकृत समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी सामंजस्य करार (MOU) स्वाक्षरीत करण्यात आला असून, लवकरच जिल्ह्यात अभियानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून आम्ही किशोरवयीन मुलींच्या आरोग्याला प्राधान्य देत आहोत आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचेल याची खात्री करत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या मोहिमेला गती देण्यासाठी ‘क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण’ (CreditAccess Grameen) संस्थेने मोलाचा हातभार लावला आहे. त्यांनी आपल्या सामाजिक दायित्व (CSR) उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी २४५० एचपीव्ही लसींचे (HPV Vaccine Doses) प्रायोजन (Support) केले आहे. त्यांच्या या महत्वपूर्ण सहकार्यामुळे गरजू मुलींना विनामूल्य लसीकरणाचा लाभ मिळणे सहज शक्य होणार आहे.

भारतामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. दर ८ मिनिटांनी एका महिलेला या आजारामुळे जीव गमवावा लागत असून, दररोज सुमारे २०० महिलांचा मृत्यू होत आहे. हा कर्करोग देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. मात्र, वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि एचपीव्ही लसीकरणाच्या माध्यमातून हा कर्करोग पूर्णपणे टाळता येऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या समावेशामुळे, १० प्राधान्य जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणाऱ्या या राज्यव्यापी अभियानाला अधिक गती मिळणार असून, भविष्यात महाराष्ट्र गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध एक आदर्श राज्य म्हणून उभे राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...

Latest News

‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की... ‘नीट’ची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण, वडिलांचे कॉल उचलले नाहीत, सोबतच्या मुलींकडून कळले की...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी खासगी होस्टेलमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाले...
‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश, २४५० एचपीव्ही लसी मिळणार
महिलेच्या बोलण्याला भाळून केलेली १७ लाखांची गुंतवणूक अंगलट, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार
फुलंब्रीत माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
आम्ही भाजप-शिंदे गटाच्या दारात जाणार नाही; तेच आमच्या दारात येतील; शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा दावा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software