ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय पडला अन्‌ कार थेट लॅबमध्ये घुसली!; गजानन महाराज मंदिर रस्त्यावर अपघाताचा थरार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अतिशहाणा तिथे बैल रिकामा... अशी एक म्हण आहे. म्हणजे, गरजेपेक्षा जास्त हुशारी दाखवल्यास स्वतःचेच नुकसान होते... असाच काहीसा प्रकार गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील ॲडव्हान्स इ. एन. टी. हॉस्पिटल येथे मंगळवारी (१७ फेब्रुवारी) रात्री १० च्या सुमारास घडला. पार्किंगमधील स्वतःची दुचाकी काढण्यासाठी दुसऱ्याच्या कारची चावी घेऊन कार बाजूला काढण्याचा खटाटोप करणाऱ्या तरुणाकडून ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय पडला अन् कार थेट तळमजल्यावरील लॅबमध्ये घुसली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र कार आणि लॅबचे मोठे नुकसान झाले आहे.

डॉ. अमोल कुलकर्णी यांनी त्यांची कार हॉस्पिटलसमोर लावली होती. रुग्णालयात दाखल एका रुग्णाचे नातेवाइक सय्यद वसीम (वय ३५, रा. कांचनवाडी) यांची दुचाकी पार्किंगमध्ये डॉ. कुलकर्णी यांच्या कारसमोर  अडकली. ती काढायची असल्याने त्यांनी हॉस्पिटलच्या रिसेप्शनवर कुलकर्णी यांच्या कारमुळे दुचाकी काढता येत नसल्याचे सांगितले. रिसेप्शनवाल्यांनी डॉक्टरांना कळवले की नाही, हे कळले नाही पण थेट कारची चावीच वसीम यांच्याकडे देऊन टाकली.

ती चावी घेऊन वसीम हे स्वतःच कार काढण्यासाठी गेले. कार बाजूला घेत असताना ब्रेकऐवजी चुकून एक्सिलेटरवर पाय गेला अन् कार रुग्णालयाच्या तळमजल्यातील एक्स-रे थेट लॅबमध्ये जाऊन घुसली. यामुळे लॅबच्या समोरील भागासह कारचे नुकसान झाले. वसीम थोडक्यात बचावले. इतका मोठा आवाज झाला, की लोक धावले. पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या आदेशावरून पुंडलिकनगर पोलिसांनीही घटनास्‍थळी धाव घेतली. गर्दी बाजूला करत क्रेनद्वारे कार बाहेर काढण्यात आली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव

Latest News

अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडपासून २ कि.मी. अंतरावर सोमवारी मध्यरात्री २:४५ वाजेच्या...
छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून ‘बुलेटराजां’वर कारवाईचा दणका
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लवकरच ६३७  ग्रामपंचायतींचे कारभारी निवडले जाणार
डीजे चालकांना पोलिस प्रशासनाची तंबी : कामे घ्याल तर डीजे जप्त करून थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा
खुलताबाद तालुक्यात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला विहिरीत; रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देणे बेतले जीवावर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software