पोलीस भरतीचे स्वप्न राहिले अधुरे, २० वर्षीय तरुणाचा धावण्याच्या सरावादरम्यान अपघाती मृत्‍यू, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या २० वर्षीय तरुणाचा मृतदेह मंगळवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी पैठण- पाचोड रस्‍त्‍यावरील रहाटगाव शिवारात आढळला. सुशांत संतोष भोजने (रा. वरूडी, सध्या मुक्काम दावरवाडी शिवार, ता. पैठण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सुशांत ६ महिन्यांपासून पोलीस भरतीचा सराव करत होता. रोज पहाटे धावण्यासाठी पैठण-पाचोड रस्त्यावर जात होता. सोमवारी पहाटे नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला. मात्र, परतलाच नाही. कुटुंबीयांनी शोध घेऊनही मिळून आला नाही. अ खेर पाचोड पोलिसांत हरवल्याची तक्रार करण्यात आली होती. मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास रहाटगावजवळील एका मोसंबी बागेजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडूपात सुशांतचा मृतदेह आढळला.

माहिती मिळताच कुटुंबीयांसह ग्रामस्थ, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पैठण येथील सरकारी रुग्णालयात आणला. अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने सुशांतचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मंगळवारी सायंकाळी वरुडी येथे सुशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची पैठण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव

Latest News

अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडपासून २ कि.मी. अंतरावर सोमवारी मध्यरात्री २:४५ वाजेच्या...
छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून ‘बुलेटराजां’वर कारवाईचा दणका
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लवकरच ६३७  ग्रामपंचायतींचे कारभारी निवडले जाणार
डीजे चालकांना पोलिस प्रशासनाची तंबी : कामे घ्याल तर डीजे जप्त करून थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा
खुलताबाद तालुक्यात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला विहिरीत; रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देणे बेतले जीवावर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software