छत्रपती संभाजीनगरात शिवजयंतीचा उत्साह शिगेला : ९५ मिरवणुका निघणार, वाहतुकीत मोठे बदल, आज सायंकाळपासूनच घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा, पर्यायी मार्ग जाणून घ्या...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह शहरात शिगेला पोहोचला आहे. उद्या, १९ फेब्रुवारीला शहरात ९५ मिरवणुका आणि ७ मशाल रॅली निघणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी ३५ ठिकाणी स्वागत मंच उभारण्यात येत आहेत. उत्सवामुळे गर्दीची आणि वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेता शहरातील प्रमुख पाच मार्ग दिवसभर राहणार आहेत.

१९ फेब्रुवारीला सकाळी ११ ते मध्यरात्री १२ पर्यंत हे मार्ग बंद
राजाबाजार चौक संस्थान गणपती- शहागंज सिटी चौक-गुलमंडी-पैठण गेट-सिल्लेखाना- क्रांती चौक- गोपाल टी
सिडको एन-१२ नर्सरी- टी.व्ही. सेंटर- जिजाऊ चौक- एम-२- एन-९- शिवनेरी कॉलनी- पार्श्वनाथ चौक- बळीराम पाटील चौक- बजरंग चौक- आविष्कार चौक- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-चिश्तिया चौक
-जयभवानीनगर चौक- गजानन महाराज मंदिर व सेव्हनहील उड्डाणपूल-आदिनाथ चौक

१८ फेब्रुवारीला सायंकाळी ६ ते रात्री १२ दरम्यान हे मार्ग बंद...
गोपाल टी पॉइंट ते सिल्लेखाना चौक
क्रांती चौक उड्डाणपुलाची पूर्व बाजू सर्व्हिस रोड ते क्रांती चौक उड्डाणपुलाची पश्चिम बाजू.
१९ फेब्रुवारीला सकाळी ११ नंतर क्रांती चौक वाहतुकीसाठी बंद राहील.

पर्यायी मार्ग असे :
वाहने गोपाल टी- उत्सव मंगल कार्यालयमार्गे पुढे जातील.
गोपाल टी- एसएससी बोर्ड चुन्नीलाल पेट्रोल पंप मार्गे पुढे जातील.
सिल्लेखाना ते सावरकर चौक, सतीश मोटर्समार्गे पुढे जातील.
सिल्लेखाना ते खोकडपुरामार्गे पुढे जातील.
क्रांती चौक उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू राहील.
शहागंज ते सिटी चौककडे येणारी वाहने चेलीपुरा- लोटाकारंजा-कामाक्षी लॉज या मार्गाचा वापर करतील.
क्रांतीचौक ते सिटी चौककडे जाणारी वाहने सावरकर चौक-कार्तिकी हॉटेल चौक- मिलकॉर्नर- भडकल गेट या मार्गाचा वापर करतील.
मिलकॉर्नरकडून औरंगपुऱ्याकडे येणारी वाहने अंजली टॉकीजसमोर उजवीकडे नागेश्वरवाडी, निराला बाजार, समर्थनगरमार्गे किंवा अंजली टॉकीजजवळ डावीकडे खडकेश्वर मनपा कार्यालयमार्गे जातील.
चांदणे चौक-अण्णाभाऊ साठे चौक- उद्धवराव पाटील चौक- हडको कॉर्नर- हर्सूल टी- शरद टी-आंबेडकर चौक- एन-१ चौक या मार्गाचा वापर करतील.
जयभवानीनगर ते गजानन महाराज मंदिराकडे येणारी व जाणारी वाहने जालना रोड मार्गाचा वापर करतील.
जवाहरनगर पोलीस स्टेशन ते सेव्हन हिलकडे येणारी वाहने माणिक हॉस्पिटल- त्रिमूर्ती चौकमार्गे जातील व येतील.

पाच शिवस्मारकांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
नवीन छत्रपती संभाजीनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे शहरातील विविध ठिकाणच्या शिवस्मारकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष बबनराव डिडोरे यांनी सांगितले की, सकाळी १० ते ११ दरम्यान ही पुष्पवृष्टी होईल. पुंडलिकनगर चौक, जय भवानीनगर चौक, सिडको एन ६, आविष्कार कॉलनी आणि क्रांती चौक आदी ठिकाणच्या पुतळ्यांवर ही पुष्पवृष्टी खा. संदीपान भुमरे यांच्या हस्ते केली जाईल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव

Latest News

अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडपासून २ कि.मी. अंतरावर सोमवारी मध्यरात्री २:४५ वाजेच्या...
छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून ‘बुलेटराजां’वर कारवाईचा दणका
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लवकरच ६३७  ग्रामपंचायतींचे कारभारी निवडले जाणार
डीजे चालकांना पोलिस प्रशासनाची तंबी : कामे घ्याल तर डीजे जप्त करून थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा
खुलताबाद तालुक्यात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला विहिरीत; रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देणे बेतले जीवावर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software