खुलताबाद तालुक्यात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला विहिरीत; रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देणे बेतले जीवावर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  रब्बी पिकांना रात्रीच्यावेळी पाणी देण्यास जाणे शेतकऱ्याच्या जीवावर बेतले.  तोल जाऊन विहिरीत पडल्याने घोडेगाव (शंकरपूरवाडी) येथील एका ४९ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी मृतदेह आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. गजानन काशीनाथ साबळे (वय ४९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन साबळे हे सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास शंकरपूरवाडी येथील गट नंबर १३ मधील त्यांच्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी मोटार सुरू करण्यास गेले होते. उशीर झाला तरी ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे ते रात्री शेतातच थांबले असतील, असे कुटुंबीयांना वाटले. मात्र, मंगळवारी सकाळी ९:३० वाजता परिसरातील शेतकरी लईक शब्बीर पठाण हे विहिरीकडे गेले असता, त्यांना गजानन साबळे यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती ग्रामस्थ व नातेवाइकांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच खुलताबाद ठाण्याचे पोहेकॉ मुळे आणि खटके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी गदाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. दुपारी ३ वाजेच्या सुमारास  साबळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत गजानन साबळे हे शंकरपूरवाडी येथील तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. तोल जाऊन विहिरीत पडल्याने साबळे यांचा बुडून मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव

Latest News

अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडपासून २ कि.मी. अंतरावर सोमवारी मध्यरात्री २:४५ वाजेच्या...
छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून ‘बुलेटराजां’वर कारवाईचा दणका
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लवकरच ६३७  ग्रामपंचायतींचे कारभारी निवडले जाणार
डीजे चालकांना पोलिस प्रशासनाची तंबी : कामे घ्याल तर डीजे जप्त करून थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा
खुलताबाद तालुक्यात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला विहिरीत; रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देणे बेतले जीवावर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software