- News
- जिल्हा न्यूज
- अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव
अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव
छत्रपती संभाजीनगर – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडजवळ भीषण दुर्घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडपासून २ कि.मी. अंतरावर सोमवारी मध्यरात्री २:४५ वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील कारचे अचानक टायर फुटले. मोठा आवाज होऊन कार रस्त्यालगतच्या दिशादर्शक लोखंडी फलकावर जाऊन आदळली. या अपघातात पाचोड येथील तरुण व्यापाऱ्याला जीव गमवावा लागला. महेश उर्फ पप्पू श्रीराम हुलजते (वय ४५ वर्षे) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे.
अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना तातडीने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. महेश हुलजते यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पाचोड येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून ‘बुलेटराजां’वर कारवाईचा दणका
By District Correspondent
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लवकरच ६३७ ग्रामपंचायतींचे कारभारी निवडले जाणार
By District Correspondent
डीजे चालकांना पोलिस प्रशासनाची तंबी : कामे घ्याल तर डीजे जप्त करून थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा
By District Correspondent
खुलताबाद तालुक्यात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला विहिरीत; रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देणे बेतले जीवावर
By District Correspondent
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
By District Correspondent
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
By District Correspondent
Latest News
18 Feb 2026 12:55:52
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडपासून २ कि.मी. अंतरावर सोमवारी मध्यरात्री २:४५ वाजेच्या...

