डीजे चालकांना पोलिस प्रशासनाची तंबी : कामे घ्याल तर डीजे जप्त करून थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

लग्नसराई, मिरवणुकीच्या काळात येणार व्यवसायावर संक्रांत

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : “आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय” हे गाणे मध्यंतरी खूप लोकप्रिय झाले होते. प्रत्येक लग्नाच्या वरातीत या गाण्याला डिमांड होती. पण आता लग्न समारंभ, जयंती उत्सवांच्या सुपाऱ्या घेऊन आवाज वाढवून धंदे करणाऱ्या डीजेचालकांना पोलीस प्रशासनाने कठोर तंबी दिली आहे.  डीजेसाठी कोणी संपर्क केला आणि तुम्ही ते काम स्वीकारून आवाजाची मर्यादा ओलांडल्यास पहिले तुमचा डीजे जप्त होईल. त्यानंतर पहिला गुन्हा तुमच्यावर दाखल होईल, असा थेट इशारा गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी डीजे चालक, मालकांना दिला आहे.

यंदाच्या जयंती मिरवणुकीत डीजे वाजवणारच, अशी भूमिका काही नेत्यांनी जाहीर केली होती. तापडिया नाट्यमंदिरात सोमवारी समन्वय समितीची बैठक पार पडली. त्यात पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत डीजे चालणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यानंतर मंगळवारी पोलिस आयुक्तालयात बैठक झाली. ५५ डीजे मालक उपस्थित होते. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी उच्च न्यायालयाचे आदेश, ध्वनिप्रदूषण संदर्भात दाखल याचिकेतील मुद्दे व कायद्यातील तरतुदीही सांगितल्या.

डीजेचालकांनी मिरवणुकीच्या सुपाऱ्या घेतली व आवाज वाढवून ध्वनी प्रदूषण केले तर प्रशासन कठोर कारवाई करून थेट गुन्हे दाखल करेल, तसेच साहित्यही जप्त करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तालय हद्दीतील १७ पोलिस ठाण्यांमध्ये आवाजाची मर्यादा तपासण्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.

बाहेरील डीजेवरही कठोर कारवाई करा
प्रशासनाच्या भूमिकेवर सुरुवातीला डीजेचालकांनी नाराजी दाखवली. पण नंतर कारवाईचा इशारा मिळताच आम्ही तुला सहकार्य करू; पण काही आयोजक बाहेरील जिल्ह्यातून डीजे बोलावतात. त्यांच्यावरही समान कारवाई करा, अशी मागणी डीजे चालक मालकांनी केली. त्याला पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. डीजे वाजत असल्यास नागरिकांनी तत्काळ ११२, नियंत्रण कक्ष ०२४०-२२४०५०० वर कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे नवले यांनी सांगितले.

न्यायालयाने ठरवून दिलेली डीजेची मानके
*औद्योगिक परिसरात दिवसा (सकाळी ६ ते रात्री ९) ७५ डेसिबल
आणि रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान ७० डेसिबल.|
*व्यावसायिक परिसरात दिवसा ६५ तर रात्री ५५ डेसिबल.
*रहिवासी परिसरात दिवसा ५५ तर रात्री ४५ डेसिबल.
*सायलेंट झोन (रुग्णालय, महाविद्यालय, शाळा, न्यायालय, धार्मिक व ऐतिहासिक स्थळे) च्या १०० मीटर परिसरात दिवसा ५० व रात्री ४० डेसिबलवर आवाज नसावा, अशी मानके उच्च न्यायालयाने ठरविली आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव

Latest News

अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडपासून २ कि.मी. अंतरावर सोमवारी मध्यरात्री २:४५ वाजेच्या...
छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून ‘बुलेटराजां’वर कारवाईचा दणका
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लवकरच ६३७  ग्रामपंचायतींचे कारभारी निवडले जाणार
डीजे चालकांना पोलिस प्रशासनाची तंबी : कामे घ्याल तर डीजे जप्त करून थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा
खुलताबाद तालुक्यात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला विहिरीत; रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देणे बेतले जीवावर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software